"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:32 IST2026-04-07T10:32:22+5:302026-04-07T10:32:58+5:30

आगामी चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटला अक्षयने प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादवसोबत जे वर्तन केलं, त्यामुळे अक्षय चर्चेत आला आहे. 'भूत बंगला'च्या इव्हेंटवेळी काय घडलं?

akshay kumar scold rajpal yadav on the bhooth bangla movie trailer launch | "अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल

"अरे मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर..."; अक्षय कुमारने राजपाल यादवला फटकारलं? व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे नाही, तर एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. आगामी चित्रपट 'भूत बंगला'च्या प्रमोशनल इव्हेंटला अक्षयने प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता राजपाल यादवसोबत जे वर्तन केलं, त्यामुळे अक्षय चर्चेत आला आहे. 'भूत बंगला'च्या इव्हेंटवेळी काय घडलं? व्हिडीओ झालाय व्हायरल.

नेमकं प्रकरण काय?

नुकत्याच झालेल्या 'भूत बंगला' सिनेमाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये अक्षय कुमार आणि राजपाल यादव स्टेजवर एकत्र होते. यादरम्यान गप्पा मारत असताना अक्षयने राजपाल यादवला उद्देशून काहीशा वेगळ्या स्वरात, ''अरे खाली बस, मी सांगतोय ना खाली बस, नाहीतर मारेन" (Beth ja, pel dunga) असे म्हटले. जरी अक्षयने हे विधान विनोदाने किंवा गमतीत केले असले, तरी सोशल मीडिया युजर्सना त्याची ही पद्धत अजिबात आवडलेली नाही.


या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. "एका चांगल्या अभिनेत्याशी बोलण्याची ही कोणती पद्धत आहे?" असा सवाल अनेक युजर्स विचारत आहेत. एका युजरने कमेंट केली की, "यश डोक्यात गेल्यावर माणसं अशीच वागतात," तर दुसऱ्याने लिहिले की, "राजपाल यादव यांनी आपल्या अभिनयाने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्यांचा असा अपमान करणे चुकीचे आहे." 

अक्षय कुमार आणि राजपाल यादव यांनी 'भूल भुलैया', 'फिर हेरा फेरी' आणि 'मुझसे शादी करोगी' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचे मानले जाते. त्यामुळे राजपालने ही गोष्ट हसण्यावारी नेली. परंतु लोकांना मात्र सर्वांसमोर अक्षयने राजपालला जे फटकारलं ते अजिबात आवजलं नाही.

Web Title : अक्षय कुमार ने राजपाल यादव को डांटा?; वीडियो से विवाद

Web Summary : 'भूत बंगला' के प्रमोशनल इवेंट में अक्षय कुमार का राजपाल यादव के प्रति व्यवहार आलोचना का विषय बना। एक वीडियो में अक्षय, यादव को डांटते हुए दिख रहे हैं, जिसे कई सोशल मीडिया उपयोगकर्ताओं ने अपमानजनक माना।

Web Title : Akshay Kumar seemingly scolds Rajpal Yadav; video sparks controversy.

Web Summary : Akshay Kumar's behavior towards Rajpal Yadav at a promotional event for 'Bhoot Bangla' has drawn criticism. A video shows Akshay seemingly scolding Yadav, which many social media users found disrespectful, despite their past collaborations.