अक्षय कुमारच्या लेकीचा पाळीव श्वानाने घेतला चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 10:54 IST2024-01-29T19:57:44+5:302024-01-30T10:54:48+5:30

निताराला रेबीजचे ३ आणि टिटॅनसचं १ इंजेक्शन लागल्याचंही ती म्हणाली.

Akshay Kumar s daughter Nitara was bitten by a pet dog had to give injections | अक्षय कुमारच्या लेकीचा पाळीव श्वानाने घेतला चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा

अक्षय कुमारच्या लेकीचा पाळीव श्वानाने घेतला चावा, ट्विंकल खन्नाने सांगितला किस्सा

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar)आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khnna)  यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. दोघंही आपल्या मुलांसोबत अनेकदा फोटो शेअर करत असतात. त्यांचा मोठा मुलगा आरव हा २१ वर्षांचा आहे तर लेक नितारा केवळ ११ वर्षांची आहे. मुलांसोबत अनेकदा सुट्ट्या एन्जॉय करताना त्यांना पाहिलं गेलं आहे. नुकतंच एका मुलाखतीत ट्विंकल खन्नाने लेक निताराला पाळीव कुत्रा चावल्याचं सांगितलं. यानंतर निताराला रेबीजचे ३ आणि टिटॅनसचं १ इंजेक्शन लागल्याचंही ती म्हणाली. नक्की काय झालं होतं हे ट्विंकल सविस्तर सांगितलं आहे.

टाईम्स ऑफ इंडियामधील नुकत्याच एका कॉलममध्ये ट्विंकल खन्ना लिहिते, 'या ख्रिसमसला आम्ही आमच्या चुलत भावाकडे होतो. माझी दोन्ही मुलं चिकन खात होती. तेव्हाच भावाचा पाळीव श्वान फ्रेडी जवळच होता. त्याने अचानक नितारासमोर असलेल्या तिच्या प्लेटवर उडी मारली आणि तो खाऊ लागला. माझ्या मुलीला ही काळजी होती की चुकून फ्रेडी त्या चिकनसोबत लाकडाचे चमचेही गिळेल. निताराने त्याला खेचायचा प्रयत्न केला. ती त्याला वाचवण्यासाठीच हे करत होती. पण फ्रेडीने तिच्या दोन्ही हातांना चावा घेतला.'

फ्रेडीच्या चाव्यानंतर निताराची प्रतिक्रिया चकित करणारी होती. तिला रेबीजचे 3 आणि टिटॅनसचं 1 इंजेक्शन लागलं. असं असतानाही तिला फ्रेडीचीच काळजी होती. निताराने हा एक अपघात असल्याचं सांगितलं. फ्रेडीला मला चावायचं नव्हतं. तो ठिक आहे मग मला काही फरक पडत नाही असं नितारा ट्विंकलला म्हणाली. 

ट्विंकलच्या दोन्ही मुलांना फ्रेडीचा लळा लागला आहे. दिवसभर थकून आल्यानंतर फ्रेडी ज्याप्रकारे आपलं स्वागत करतो ते आठवून ट्विंकलही भावूक झाली. तसंच ती गंमतीत म्हणाल, जर लोकांनी आपापल्या पार्टनर्सचं स्वागत घरात या पाळीव प्राण्यांसारखं केलं तर अनेक घटस्फोट होतील.

Web Title: Akshay Kumar s daughter Nitara was bitten by a pet dog had to give injections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.