'भूत बंगला'मध्ये २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अक्षयचा रोमान्स; ट्रोल होताच अभिनेता म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:13 IST2026-03-25T12:10:53+5:302026-03-25T12:13:57+5:30

५८ वर्षांच्या अक्षय कुमारसोबत २६ वर्षाच्या वामिकाला ऑनस्क्रिन रोमान्स करताना पाहून अनेकांना त्यांच्या वयाबद्दल प्रश्न पडले. आता खुद्द अक्षयने या चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

akshay kumar reaction on age gap with wamiqa gabbi in bhoot bangla movie says | 'भूत बंगला'मध्ये २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अक्षयचा रोमान्स; ट्रोल होताच अभिनेता म्हणाला... 

'भूत बंगला'मध्ये २६ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अक्षयचा रोमान्स; ट्रोल होताच अभिनेता म्हणाला... 

Akshay Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करणार्‍या कलावंतांमध्ये सध्या आघाडीवर असणारा खिलाडी म्हणून प्रसिध्द असलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार.'शेफ' म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणारा अक्षय आता बॉलीवूडमधला 'सबसे बडा खिलाडी' ठरला आहे. सुरवातीला ॲक्शनपट करणारा अक्षय आता ॲक्शन-विनोद-थ्रिलर यांची उत्तम भेळ सादर करणारा कलावंत ठरला आहे.सध्या अक्षय त्याचा आगामी भूत बंगला या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात त्याची आणि अभिनेत्री वामिका गब्बीची जोडी जमली आहे.


दरम्यान, नुकतंच या चित्रपटातील 'Tu Hi Disda' हे नवंकोरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. त्यानंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री वामिका गब्बी यांच्यातील वयाच्या अंतराबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. आता या मुद्द्यावर अक्षय कुमारने एका मुलाखतीत २६ वर्षांनी लहान असलेल्या वामिकासोबत ऑनस्क्रिन रोमान्स करण्याच्या मु्द्यावर स्पष्टपणे त्याचं मत मांडलं आहे. न्यूज १८ सोबत संवाद साधताना अभिनेता म्हणाला,"आपण याआधी सिनेमांमध्ये  हे सगळं पाहिलं आहे. हॉलिवूड चित्रपटांमध्ये तर सर्सास असे सीन्स पाहायला मिळतात. खऱ्या आयुष्यातही लोक आपल्यापेक्षा वयाने छोट्या किंवा मोठ्या पार्टनरसोबत लग्न करतात. या गोष्टी आपल्यासाठी काही नवीन नाहीत. पुढे अक्षयने वामिकाचं कौतुक करत म्हणाला, "मी वामिकाला पहिल्यांदा 'भूत बंगला'च्या सेटवर भेटलो. ती तिचे सीन पुन्हा पुन्हा वाचते आणि त्यांचा सराव करते.ती खूप गांभीर्याने काम करते."

दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी देखील कलाकारांच्या वयाच्या अंतरावरून होणार्‍या ट्रोलिंगवर आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, "एमजीआर आणि एनटीआर यांच्यासारखे दिग्गजही म्हणायचे की, कलाकारांच्या खऱ्या वयात आणि स्क्रिनवर त्यांचं दिसणं यात खूप फरक असतो. लोक तुम्हाला तुमच्या पडद्यावरील वयानुसार स्विकारतात. मला त्यात काही अडचण वाटत नाही." 

प्रियदर्शन पुढे म्हणाले,"जेव्हा मी अक्षय किंवा तब्बू सोबत काम करतो तेव्हा मला कधीच असं वाटत नाही. जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहतात, तेव्हा त्यांनाही त्यांच्या वयातील अंतराचा त्रास होत नाही. हे त्यांच्या पात्रांमुळे आणि त्यांच्या स्क्रिन प्रेझेन्समुळे शक्य झालं आहे." असं त्यांनी सांगितलं.

‘भूत बंगला’ या चित्रपटात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव मुख्य भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले असून, निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर आहेत. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title : अक्षय कुमार ने 'भूत बंगला' में उम्र के अंतर वाले रोमांस पर दी प्रतिक्रिया

Web Summary : अक्षय कुमार ने 'भूत बंगला' में वमिका गब्बी के साथ अपने रोमांस का बचाव किया, वास्तविक जीवन के रिश्तों व हॉलीवुड का हवाला दिया। निर्देशक प्रियदर्शन ने उम्र के अंतर की चिंताओं को खारिज कर दिया, अभिनेताओं की स्क्रीन उपस्थिति पर जोर दिया। फिल्म 10 अप्रैल, 2026 को रिलीज होगी।

Web Title : Akshay Kumar Addresses Age Gap Romance in 'Bhoot Bungalow' Amid Criticism

Web Summary : Akshay Kumar defended his on-screen romance with Wamiqa Gabbi in 'Bhoot Bungalow,' citing real-life relationships and Hollywood precedents. Director Priyadarshan dismissed age gap concerns, emphasizing actors' screen age and presence. The film releases April 10, 2026.