भारत vs इंडिया वाद; अक्षय कुमारने बदलले त्याच्या चित्रपटाचे नाव, नवीन नाव काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 18:59 IST2023-09-06T18:58:04+5:302023-09-06T18:59:35+5:30

देशात इंडिया vs भारत वाद सुरू आहे, यादरम्यान अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव बदलले आहे.

Akshay Kumar Movie: India vs bharat controversy; Akshay Kumar changed the name of his upcoming movie | भारत vs इंडिया वाद; अक्षय कुमारने बदलले त्याच्या चित्रपटाचे नाव, नवीन नाव काय..?

भारत vs इंडिया वाद; अक्षय कुमारने बदलले त्याच्या चित्रपटाचे नाव, नवीन नाव काय..?

Akshay Kumar Movie: सध्या देशात इंडिया vs भारत वाद सुरू आहे. देशाचे नाव इंडियाऐवजी भारत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. या वादादरम्यान, बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने त्याच्या आगामी 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' चित्रपटाचे नाव बदलून 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' असे केले आहे. 

OMG 2 चित्रपटाच्या यशानंतर आता अक्षय कुमार एका नवीन अवतारात दिसणार आहे. अक्षयने आजच या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. टीझरमध्ये तो खाण अभियंता(माईन इंजिनीअर) जसवंत सिंग गिल यांच्या भूमिकेत दिसत आहे. जसवंत सिंग यांच्या शौर्यावर हा चित्रपट आधारित आहे. 1989 मध्ये जसवंत यांनी जमिनीखाली 350 फूट अडकलेल्या 65 खाण कामगारांना वाचवले होते.

ही घटना बिहारच्या रानीगंजमध्ये घडली, ज्याला मिशन रानीगंज म्हणूनही ओळखले जाते. यापूर्वी या चित्रपटाचे नाव 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' असे होते. पण आता नवीन व्हिडिओसह अक्षयने 'मिशन राणीगंज: द ग्रेट भारत बचाव' या चित्रपटाचे नवीन नाव जाहीर केले आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे नाव बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, तेव्हा चित्रपटाला 'कॅप्सूल गिल' असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर 'द ग्रेट इंडियन रेस्क्यू' आणि आता 'मिशन राणीगंज: ग्रेट भारत बचाव' नाव दिले आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. अक्षय कुमारचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 6 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Akshay Kumar Movie: India vs bharat controversy; Akshay Kumar changed the name of his upcoming movie