Selfiee Trailer : सुपरस्टार विरूद्ध सुपरफॅन... अक्षय-इमरानच्या ‘सेल्फी’चा ट्रेलर पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 18:37 IST2023-01-22T18:37:26+5:302023-01-22T18:37:56+5:30
अक्षय कुमार (akshay Kumar ) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Selfiee Trailer ) रिलीज झाला आहे.

Selfiee Trailer : सुपरस्टार विरूद्ध सुपरफॅन... अक्षय-इमरानच्या ‘सेल्फी’चा ट्रेलर पाहिलात का?
अक्षय कुमार (akshay Kumar ) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या ‘सेल्फी’ या चित्रपटाचा ट्रेलर (Selfiee Trailer ) रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार एक सुपरस्टार आहे तर इमरान हाश्मी आरटीओ ऑफिसरच्या भूमिकेत आहे. करण जोहरच्या ‘धर्मा प्रोडक्शन’ या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटात एक बॉलिवूड सुपरस्टार व त्याचा चाहता या दोघांतला राडा पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरच्या सुरुवातीलाच खिलाडी कुमार आगीतून बाहेर पडताना दिसत आहे आणि 'जंगल मेरा मुझे कहते हैं शेर' असा डायलॉग म्हणतो. यात अभिनेत्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असते तर आरटीओ ऑफिसरला त्याच्यासोबत सेल्फी. 'सुपरस्टार विजयला परवाना हवा असेल तर त्याला इथे येऊन सर्वसामान्यांप्रमाणे सर्व टेस्ट द्याव्या लागतील.' असं आरटीओ ऑफिसर(इमरान) म्हणतो. इथूनच दोघांत राडा सुरू होतो. चित्रपटात नुसरत भरूचा इमरानच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.
ड्रामा, अॅक्शन, रोमान्स असं सगळं काही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय. त्यामुळे हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
करण जोहर आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन या दोघांनी मिळून हा सिनेमा प्राेड्यूस केला आहे. राज मेहता यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करत आहेत. दोघांनाही एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. यांच्याबरोबरच नुशरत भरूचा, डायना पेंटी यांच्याही चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या २४ फेब्रुवारीला ‘सेल्फी’ प्रदर्शित होणार आहे.