Akshay Kumar : “अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:51 IST2023-04-09T14:49:58+5:302023-04-09T14:51:34+5:30
Akshay Kumar : गेल्या काही महिन्यात आलेले अक्षयचे अनेक सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.

Akshay Kumar : “अरे तुझं वय काय आणि तू...” मौनीसोबत नाचताना अक्षय झाला शर्टलेस, पाहून भडकले चाहते
Akshay Kumar Mouni Roy Shirtless Video : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा इंडस्ट्रीतला सर्वात फिट आणि हिट अभिनेता आहे. पण हाच अक्की सध्या ट्रोल होतोय. या वयातही अक्षयचा फिटनेसवर कायम आहे, पण सिनेमे एकापाठोपाठ फ्लॉप होत आहेत. गेल्या काही महिन्यात आलेले अक्षयचे अनेक सिनेमे दणकून आपटलेत. अशात आता अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या रडारवर आला आहे.
Who is #HrithikRoshan ?
— SRK'sMjolnir🔥⚒️ (@SrkMjolnir) April 8, 2023
The biggest dancer indian cinema has ever witnessed is the one and only SETH-JI #AkshayKumar
Don't mess with him 😭😭😭pic.twitter.com/HdDbs9UCop
हा व्हिडीओ अक्षयच्या द एंटरटेनर्स टूरचा आहे. या टूरदरम्यान अक्षय मौनी राय, सोनम बाजवा, नोरा फतेही व दिशा पटानी यांच्यासोबत अमेरिकेत डान्स परफॉर्मन्स करत फिरत आहे. व्हिडीओत अक्षय मौनीसोबत बलमा या गाण्यावर थिरकताना दिसतोय आणि त्याचा हा डान्स नेटकऱ्यांच्या संतापाचा विषय ठरला आहे. अक्षय यात शर्टलेस लुकमध्ये दिसतोय आणि नेमकी हीच गोष्ट अनेकांना खटकली आहे. अरे तुझं वय काय आणि तू काय करतोय, असं एका युजरने लिहिलं. अक्षय तू जे काही करतो आहेस ती आपली संस्कृती नाही. ती कॅनडा देशाची संस्कृती आहे, अशा शब्दांत एकाने अक्षयला ट्रोल केलं. ५९ वर्षांचा शर्टलेस अंकल २३-२४ वर्षांच्या मुलींसोबत नाचतो आहे, तुला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.
याआधीही अक्षयचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तो नोरा फतेहीसोबत सामंथाच्या ओ अंटावासोबत गाण्यावर थिरकताना दिसला होता.