Akshay Kumar : अक्षय कुमारने रागाच्या भरात चाहत्याचा फोन जोरात हिसकावला, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:33 IST2025-07-22T15:29:25+5:302025-07-22T15:33:50+5:30
Akshay Kumar Viral Video : अक्षय कुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षय सेल्फी घेणाऱ्या चाहत्याचा फोन हिसकावताना दिसतो. काय आहे संपूर्ण प्रकरण

Akshay Kumar : अक्षय कुमारने रागाच्या भरात चाहत्याचा फोन जोरात हिसकावला, व्हिडीओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
Akshay Kumar Viral Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अक्षयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय एका चाहत्यावर चिडलेला दिसतो. अक्षयचा हा रुद्रावतार बघून सगळेच थक्क झाले. फोटोशूट करणाऱ्या चाहत्याचा फोनही अक्षयने खेचून घेतला, असं व्हायरल व्हिडीओत दिसतंय. या सर्व प्रकरणावर स्वतः त्या चाहत्याने मौन सोडलंय.
काय घडलं नेमकं?
ही घटना ‘हेराफेरी ३’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची असल्याचे समजते. एक व्यक्ती अक्षयचा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये शूट करत असतो. अक्षयची नजर त्या व्यक्तीकडे जाते. तो रागातच म्हणताना दिसतो, "मी सांगतो ना, हात खाली कर." असं म्हणताच अक्षय रागाच्या भरात त्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेतल्याचं दिसतं. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अक्षयच्या वागण्यावर टीका केली आणि चाहत्याशी उर्मटपणे बोलतोय, म्हणून त्याच्यावर संताप व्यक्त केला.
सत्य नेमकं काय?
मात्र या चर्चांना पूर्णविराम देत, संबंधित चाहत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन स्पष्टीकरण केलं. त्यात त्याने लिहिले की, "मी अक्षय सरांचा खूप मोठा फॅन आहे. त्या दिवशी मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी सेल्फी घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण माझा हात त्यांच्या खूप जवळ गेला. तेवढ्यापुरतंच त्यांनी मला हात खाली ठेवायला सांगितलं. ते मला याबद्दल मला रागावले नाहीत. त्यामुळे यात माफी मागण्यासारखं काहीच नव्हतं. ते अत्यंत नम्रपणे वागले."
चाहत्यांने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर अक्षयविषयी जो गैरसमजूत पसरला तो दूर झाला. चाहत्याने त्याचा आणि अक्षय कुमारचा सेल्फीही पोस्ट केला. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो सध्या 'भूत बंगला' आणि ‘हेराफेरी ३’ या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.