'हेराफेरी'नंतर 25 वर्ष तब्बू-अक्षयने केलं नाही एकत्र काम, खिलाडी कुमारने सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 09:46 IST2026-04-07T09:45:39+5:302026-04-07T09:46:10+5:30
Akshay kumar and Tabu: 'भूत बंगला' या सिनेमाच्या निमित्ताने २५ वर्षानंतर अक्षय-तब्बू ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

'हेराफेरी'नंतर 25 वर्ष तब्बू-अक्षयने केलं नाही एकत्र काम, खिलाडी कुमारने सांगितलं खरं कारण
सध्या कलाविश्वात अनेक नवनवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगलीये ती अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'भूत बंगला' या आगामी सिनेमाची. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरच्या निमित्ताने बरीच चर्चा चाहत्यांमध्ये होतीये. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास २५ वर्षानंतर अक्षय आणि तब्बू यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे इतकी वर्ष या दोघांनी एकत्र काम का केलं नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, या प्रश्नाचं उत्तर याच कलाकारांनी दिलं आहे.
अक्षय आणि तब्बू हेराफेरी या सिनेमा अखेरचे झळकले होते. त्यानंतर ते कोणत्याही सिनेमात पुन्हा दिसले नाहीत. या दोघांनाही त्यांच्या करिअरची सुरुवात एकत्रच केली होती. त्यामुळे त्यांच्यात चांगलं मैत्रीचं नात आहे. मात्र, असं असूनही त्यांनी फार मोजक्या सिनेमात एकत्र काम केलं. यामागचं कारण, तब्बूने ट्रेलर लॉन्चचं कार्यक्रमात सांगितलं.
''या सिनेमासारखंच अक्षय माझ्या आयुष्यातून भुतासारखा अचानक गायब झाला आणि हेच कारण आहे ज्यामुळे आम्ही इतकी वर्ष एकत्र काम केलं नाही'', असं मजेशीर अंदाजात तब्बूने उत्तर दिलं. तिच्याच वाक्याची री ओढत अक्षयने खरं कारण सांगितलं.
अक्षयने सांगितलं तब्बूसोबत काम न करण्यामागचं कारण
''हेराफेरीनंतर असा कोणता सिनेमाच आला नाही ज्यात आम्ही दोघे एकत्र काम करु शकलो असतो. तब्बू तिच्या कामात बिझी होती आणि मी माझ्या सिनेमांमध्ये. आणि, या सगळ्यात प्रियदर्शन सर कोणत्या कामात बिझी होते काय माहित. परंतु, त्यांचा भूत बंगला असा सिनेमा आहे ज्यात आम्ही दोघे एकत्र काम करु शकतो असं त्यांना वाटलं आणि हाच सिनेमा आमच्यासाठी योग्यही ठरला'', असं अक्षय म्हणाला.
''हे दोघे २५ वर्षानंतर एकत्र काम करतायेत पण त्यांच्यात जराही बदल झालेला नाही. तब्बू आजही मला तितकाच त्रास देते जशी ती आधी मला द्यायची. तिच्यासोबत मी ८ सिनेमा केले आहेत. हा या दोघांमध्ये इतकाच फरक झालाय तो म्हणजे दोघांच्याही डोक्यावरचे केस आता कमी झाले आहेत'', असं प्रियदर्शन म्हणाले. दरम्यान, भूत बंगला या सिनेमात अक्षय कुमार, वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे.