जॉली एलएलबी ३ येतोय, पण आधीच्या २ भागांचं वैशिष्ट्य काय? कोर्टरुमलाच बनवलं कॉमेडीचं मैदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:55 IST2025-08-25T14:54:31+5:302025-08-25T14:55:17+5:30
कोर्टरुममध्ये धमाल येणार, दोन जॉली एकत्र येणार; आधीच्या दोन पार्ट्सची वैशिष्ट्य नेमकी काय?

जॉली एलएलबी ३ येतोय, पण आधीच्या २ भागांचं वैशिष्ट्य काय? कोर्टरुमलाच बनवलं कॉमेडीचं मैदान
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा 'जॉली एलएलबी ३' लवकरच प्रदर्शित होत आहे. आधी २०१३ साली अर्शद वारसीला घेऊन याचा पहिला भाग आला होता. तर दुसरा भाग २०१७ साली आला होता ज्यात अक्षय कुमार होता. आता तिसऱ्या भागात अर्शद वारसी आणि अक्षय कुमार दोघंही आहेत. त्यामुळे दुप्पट मजा येणार आहे. जॉली एलएलबी ही सिनेमा फ्रँचायझी म्हणजे विनोद, उपहास आणि कटू सत्याचं असं मिश्रण होतं, जे विसरणं अशक्य आहे. याआधीच्या दोन्ही भागांतील ५ गोष्टी ज्या कायम लक्षात राहिल्या आहेत त्या कोणत्या वाचा.
उपहास आणि विनोद यांचा जबरदस्त तडका
या फ्रँचायझीची सर्वात मोठी ताकद म्हणजे दमदार संवाद. धारदार पंचलाइन, मजेदार टिप्पणी आणि कोर्टरूममध्ये पिकलेला हशा; यातून हेच सिद्ध झालं कॉमेडीतूनही स्मार्ट स्टोरी सांगता येते.
कोणत्याही परिस्थितीत अन्यायाविरुद्धची लढाई
भाग १ मध्ये अर्शद वारसीचा जॉली बोमन इराणीसारख्या अनुभवी वकिलाशी भिडणं असो, किंवा भाग 2 मध्ये अक्षय कुमारचा जॉली वैयक्तिक नुकसानीनंतर पुन्हा उभा राहणं असो – दोन्ही भागांनी आपल्याला अशा अंडरडॉगची कथा दिली ज्यावर आपोआप टाळ्या वाजतात.
या सगळ्यात दिसणारे न्यायाधीश सौरभ शुक्ला
सौरभ शुक्ला यांच्या विनोदाचं टायमिंग दोन्ही चित्रपटांचा आत्मा आहे. कोर्टरुम मध्ये घडणारा गोंधळ मिटवण्याचे सीन्स जे आजही आयकॉनिक मानले जातात.
कोर्टरूममधील आयकॉनिक सीन
गंभीर वादविवाद जे अचानक कॉमेडीमध्ये बदलतात, किंवा केसच्या मध्येच येणारे अनपेक्षित ट्विस्ट – जॉली एलएलबीने आपल्याला असे काही कोर्टरूमचे क्षण दिले आहेत, जे कालातीत आहेत. आता भाग 3 मध्ये यात आणखी भर पडणार आहे कारण यावेळी कोर्टात दोन-दोन जॉली हजर असणार आहेत.
दोन जॉलींचा महाभारत
पहिल्यांदा अर्शद वारसीचा जॉली त्यागी आणि अक्षय कुमारचा जॉली मिश्रा एकाच कोर्टरूममध्ये समोरासमोर येणार आहेत. दोन तीक्ष्ण बुद्धीचे वकील, दोन वेगवेगळ्या शैली – हा संघर्ष पाहणं स्वप्नवतच आहे.
या धमाकेदार चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केलं आहे. 19 सप्टेंबरला जॉली एलएलबी 3 प्रदर्शित होत आहे, म्हणजे कोर्टरूममध्ये यावेळी सर्वात मोठा ड्रामा नक्कीच पाहायला मिळेल.