अजय देवगण आणि करण जोहरमधले भांडण अखेर मिटले, हा घ्या पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 17:55 IST2018-11-16T17:50:09+5:302018-11-16T17:55:38+5:30
सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 2016मध्ये अजय आणि करणच्या संबंधामध्ये दुरावा आला होता.

अजय देवगण आणि करण जोहरमधले भांडण अखेर मिटले, हा घ्या पुरावा
करण जोहरचा शो 'कॉफी विद करण 6'मध्ये अनेक जोड्यांची धमाल-मस्ती पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या भागात काजोल आणि अजय देवगणची जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर तिघांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. 2016मध्ये अजय आणि करणच्या संबंधामध्ये दुरावा आला होता.
शोचा होस्ट करण जोहरने तिघांचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्याला त्याने एक कॅप्शन दिले आहे, एक टॅलेंटेड हसबॅड-वाईफसोबत कॉफी. तिघांमध्ये चांगली बॉन्डिंग दिसतेय. 2016मध्ये अजय देवगणचा 'शिवाय' आणि करण जोहरचा 'ए दिल है मुश्किल' सिनेमा एकाच दिवशी रिलीज झाले होते त्यादिवसापासून दोघांमध्ये दुरावा आल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार दोघांमधील संबंध आता सुधारले आहेत. याच कारण संबंध पूर्ववत होण्याचे कारण दुसरं तिसरं कोणी नसून काजोल आहे. सिनेमांबाबत बोलायचे झाले तर अजय देवगण 'तानाजी-द अनसंग वॉरियर' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या अजय तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. यासिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊत करतोय. सिनेमाचे बजेच जवळपास १५० कोटींचे आहे. यातील सर्वाधिक खर्च वीएफएक्सवर करण्यात येणार आहे. तर करण जोहरचा ब्रह्मास्त्र सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी दिसणार आहे.