'सन ऑफ सरदार 2' च्या शूटिंगला सुरुवात, अजय देवगणने शेअर केला BTS व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 16:05 IST2024-08-06T16:05:08+5:302024-08-06T16:05:46+5:30

'सन ऑफ सरदार' च्या सीक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी 'ही' अभिनेत्री

Ajay Devgan shared BTS video of 'Son of Sardaar 2' shooting | 'सन ऑफ सरदार 2' च्या शूटिंगला सुरुवात, अजय देवगणने शेअर केला BTS व्हिडिओ

'सन ऑफ सरदार 2' च्या शूटिंगला सुरुवात, अजय देवगणने शेअर केला BTS व्हिडिओ

अजय देवगण (Ajay Devgn), संजय दत्तचा 'सन ऑफ सरदार' (Son Of Sardar) सिनेमा चांगलाच हिट झाला होता. 2012 साली आलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. सिनेमाची गोष्ट, गाणी सगळंच अफलातून होतं. आता तब्बल १२ वर्षांनी सिनेमाचा सीक्वेल येणार आहे. नुकतंच सन ऑफ सरदार 2 चं शूट सुरु झालं आहे. याची झलक अजय देवगणने दाखवली. दरम्यान सीक्वेलमध्ये संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा नसणार आहेत.

'सन ऑफ सरदार 2' मध्ये सोनाक्षी सिन्हाच्या जागी अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. तर संजय दत्तच्या जागी रवी किशन यांची वर्णी लागली आहे. अजय देवगणने BTS व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो गुरुद्वारामध्ये गेला आहे. तर अजयचा मुलगा युग क्लॅप बोर्ड घेऊन उभा आहे. मृणाल ठाकूर पंजाबी लूकध्ये ढोल वाजवताना दिसत आहे. यूकेमध्ये सिनेमाचं शूट सुरु झालं आहे. यूकेच्या रस्त्यावर क्रू मेंबर्स भांगडा करताना दिसत आहेत. 


'सन ऑफ सरदार 2'चं परदेशात शूट झाल्यावर राहिलेला भाग मुंबईतही शूट होणार आहे. संजय दत्तला यूकेचा व्हिसा मिळू शकत नसल्याने त्याला सीक्वेलमध्ये घेता आले नाही अशी चर्चा आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होईल असा अंदाज आहे. अजय देवगणचा 'सिंघम अगेन','रेड 2','दे दे प्यार 2','टोटल धमाल',' गोलमाल 5' हे सर्व सिनेमे रांगेत आहेत. यापैकी काही यावर्षी तर इतर पुढील वर्षी रिलीज होणार आहेत. 

Web Title: Ajay Devgan shared BTS video of 'Son of Sardaar 2' shooting