ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:41 IST2025-04-07T10:40:05+5:302025-04-07T10:41:53+5:30
ऐश्वर्या राय, तब्बू आणि शाहरुख खानसोबतही स्क्रीनवर झळकलेला अभिनेता आता काय करतो?

ऐश्वर्या रायसोबत केला रोमान्स, दिवाळखोर झाला अभिनेता, टॉयलेटही केलं साफ; आता काय करतो?
मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अचानक एकाएकी स्क्रीनवरुन गायब झालेत. एखाद्या सिनेमातून रातोरात स्टार होऊन काही कलाकारांनी सिनेसृष्टीच सोडली. असाच एक अभिनेता ज्याने सौंदर्यवती ऐश्वर्या रायसोबत स्क्रीनवर रोमान्स केला आहे. आज तो अभिनेता कुठे असा प्रश्न अनेकांना पडला असेल. कोण आहे हा अभिनेता?
ऐश्वर्या राय, तब्बू आणि शाहरुख खानसोबतही स्क्रीनवर झळकलेला अभिनेता मिर्जा अब्बास अली (Mirza Abbas Ali). २००० साली आलेला 'कंदुकोंडेन कंदुकोंडेन' या सिनेमात त्याने ऐश्वर्या रायसोबत काम केलं होतं. यामध्ये दोघांचा रोमान्सही होता. शिवाय सिनेमात अभिनेत्री तब्बूही होती. सिनेमा फ्लॉप झाला होता. हा अभिनेता आता कुठे गेला?
२०१५ मध्ये मिर्झा अब्बास अलीने सिनेसृष्टीतून निरोप घेतला. नंतर त्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. घराचं भाडं देण्याचेही त्याच्याजवळ पैसै नव्हते. उदरनिर्वाहासाठी त्याने चक्क टॉयलेटही साफ केलं. तर कधी टॅक्सी चालवली. सध्या अभिनेता न्यूझीलंडमध्ये असून तिथे तो मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून काम करत आहे.
अभिनेता मिर्झा अब्बास अलीने १९९६ साली 'कधल देसम' तमिळ सिनेमातून पदार्पण केलं होतं. यामध्येही तब्बू होती. हा सिनेमा चांगलाच हिट झाला. यानंतर त्याने 'प्रिया ओ प्रिया', 'राजहंसा', 'राजा', 'सुयमवरम' आणि 'पदयप्पा' या सिनेमांमध्ये काम केलं. २००२ साली 'अंश' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर मात्र साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीमध्ये तो फ्लॉप होऊ लागला आणि त्याच्या करिअरला ब्रेक लागला.