अगदी आईची सावली! ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 11:00 IST2024-03-04T10:57:18+5:302024-03-04T11:00:08+5:30
आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

अगदी आईची सावली! ऐश्वर्याच्या लेकीवर चाहते फिदा; अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमधील व्हिडीओ व्हायरल
अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा जामनगरमध्ये धूमधडाक्यात पार पडला. या भव्य सोहळ्यात जगभरातून एक हजारहून अधिक पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला बच्चन कुटुंबाने हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय व लेक आराध्या, श्वेता बच्चन नंदा आणि तिची मुलं अगस्त्य व नव्या नवेली यांचे व्हिडीओ समोर येत आहे. यात सर्वांत जास्त लक्ष वेधलं ते म्हणजे विश्वसुंदरी ऐश्वर्या रायच्या लेकीनं.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लाडकी मुलगी आराध्या बच्चन हिचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत व राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात आराध्या आपल्या आई-वडिलांसोबत दिसून आली. यावेळी यावेळी आराध्या वेगळ्या लूकमध्ये दिसली. आराध्या बदललेल्या हेयर स्टाईलसह मेकअपमध्ये दिसली. यादरम्यान तिचा लुक पूर्णपणे बदललेला दिसत आहे. आराध्याने फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. अशा परिस्थितीत तिला ओळखणेही कठीण झालं होतं.
व्हायरल व्हिडीओमध्ये ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र दिसून येत आहेत. आराध्या आई ऐश्वर्याचा हात धरून कार्यक्रमात एन्ट्री करताना दिसून येत आहे. यावेळी ऐश्वर्याही अगदी सुंदर दिसत असल्याचं पाहायला मिळतंय. पण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या नजरा ऐश्वर्याकडे नसून आराध्याकडे लागल्या. आराध्याचा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याचबरोबर ऐश्वर्यांच्या लेकीचा पुर्ण चेहरा दिसल्याचे अनेकांनी म्हटले आहे.
ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. आराध्या बच्चनची कोणतीही पोस्ट येताच सोशल मीडियावर खळबळ उडवून देते. आराध्याची लोकप्रियता इतकी आहे की लोकांना तिची आई ऐश्वर्या रायपेक्षा तिचे व्हिडीओ आणि फोटो जास्त आवडतात. आराध्यावर प्रेमाचा वर्षाव होतो.