ऐश्वर्या रायपेक्षाही आहे सुंदर,कोण आहे ती सौंदर्यवती जीने सा-यांचे वेधले लक्ष?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 06:39 AM2017-11-01T06:39:53+5:302017-11-01T12:09:53+5:30

तिचे  बोलके डोळे, तिचे घायाळ करणारे सौदर्य सध्या सोशल मीडियावर एका तरूणीने सा-यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर ...

Aishwarya is more beautiful than Rai, who is the beauty of the beauty of Savitwati? | ऐश्वर्या रायपेक्षाही आहे सुंदर,कोण आहे ती सौंदर्यवती जीने सा-यांचे वेधले लक्ष?

ऐश्वर्या रायपेक्षाही आहे सुंदर,कोण आहे ती सौंदर्यवती जीने सा-यांचे वेधले लक्ष?

googlenewsNext
चे  बोलके डोळे, तिचे घायाळ करणारे सौदर्य सध्या सोशल मीडियावर एका तरूणीने सा-यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारी ती सौंदर्यवती कोण अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. तिचे प्रत्येक फोटो पाहून तिला खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही मिळतायेत. तिचे सौदर्य पाहून बॉलिवूडच्या अभिनेत्रींचे सौदर्यही कमी पडेल अशा प्रतिक्रीया मिळत असल्याचे पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे तिची थेट ऐश्वर्या रायसह तुलना करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे.सोशल मीडियावर आपल्या सौदर्याची जादू  पसरवणारी ती आहे इराणी मॉडेल महलाघा जबेरी.इराणमध्ये महलाघाचा जन्मल झाला असून ती आता अमेरिकेत राहते. अनेक सर्वेक्षणांमध्ये जगातील सर्वाधिक सुंदर महिला म्हणून महलाघा मोडली जाते. मॉडेलिंगच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेली ही मॉडेल सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्यामुळे लाइमलाइटमध्ये आली.  महलाघाची लोकप्रियता ही फक्त इराण देशापुरतीच मर्यादित नाहीय तर इतर देशांमध्ये तिच्या सौदर्याचे दिवाने आहेत. ती सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिचे एक से बढकर एक फोटो ती सोशल मीडियावर अपलोड करत असते.तिच्या घायाळ करणा-या  फोटोंमुळेच  इन्स्टाग्रामवर तिचे २.३ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत. महालाघाच्या सौदर्यामुळेच अनेक मोठे फॅशन डिझायर्नसची महलघा ही पहिली पसंती बनली आहे.वॉल्टर मेन्डेज, मिस होली क्लोथिग अशा बड्या बॅनरसाठी  तिने आजवर अनेक जाहिरांमध्येही काम केले आहे. महलघा फिटनेस लव्हर आहे.ती रोज योगा करत असून एकही दिवस ती योगा चुकवत नाही.मुळात तिचा तासन तास जीममध्ये वर्कआऊट करण्यावर विश्वास नसून ती योगाकरण्यालाच पसंती देते. योगा करणे हे सगळ्यांपेक्षा उत्तम असून तुम्हाला परफेक्ट फिगर आणि मन शांतीसाठी योगाशिवाय दुसरा चांगला पर्यायच नसल्याचे ती सांगते.त्यामुळे इतरांनाही ती योगाचे महत्त्व पटवून देत असते. सध्या सोशल मीडियावर कोणी बॉलिवूड- हॉलिवूड नाहीतर चक्क या इराणी मॉडेल महलाघा जबेरीच्या मादक अदांवर सारेच फिदा झाल्याचे पाहायला मिळत आहे..

Also Read: या सिनेमाने ऐश्वर्या रायला मिळवून दिली होती नवी ओळख...




 

Web Title: Aishwarya is more beautiful than Rai, who is the beauty of the beauty of Savitwati?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.