भारतातच नव्हे परदेशातही 'सैयारा'ची धूम! ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! भारतातील कलेक्शन किती? जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:49 IST2025-08-06T10:46:25+5:302025-08-06T10:49:02+5:30

'सैयारा'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! भारतातील कलेक्शन किती? जाणून घ्या...

ahaan pandey and aneet padda starrer saiyaara movie breaks records know about worldwide collection | भारतातच नव्हे परदेशातही 'सैयारा'ची धूम! ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! भारतातील कलेक्शन किती? जाणून घ्या 

भारतातच नव्हे परदेशातही 'सैयारा'ची धूम! ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री! भारतातील कलेक्शन किती? जाणून घ्या 

Saiyaara Worldwide Collection : मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अभिनेता अहान पांडे आणि अभिनेत्री अनीत पड्डा या नवख्या कलाकारांच्या भूमिका असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत सगळे रेकॉर्डस मोडले आहेत. या चित्रपटाला केवळ भारतातच नाही तर परदेशातही तितकाच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हा बहुचर्चित चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. परंतु,  बॉक्स ऑफिसवर अजूनही या चित्रपटाचा दबदबा कायम आहे. 

दरम्यान, सैयारा यंदाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. 'सैयारा'चा वर्ल्डवाईल्ड कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. सॅकनिल्करच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत भारतात ३०४.६० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर जगभरात या चित्रपटाचे कलेक्शन ५०७ कोटी रुपये झाले आहे. या आकडेवारीत थोडाफार बदल होऊ शकतो.

'सैयारा' ने सलमान खानचा 'बजरंगी भाईजान', 'सुलतान', हृतिक रोशनचा 'वॉर' आणि दीपिका पदुकोणचा 'पद्मावत' या चित्रपटांना मागे टाकले आहे. या चित्रपटाने अनेक दिग्गज कलाकारांच्या सिनेमांचे रकॉर्ड्स मोडले आहेत. सध्या 'सैयारा' सिनेमाची सगळीकडे चर्चा आहे. हा सिनेमा युवा पिढीने चांगलाच डोक्यावर घेतलेला दिसतोय.

Web Title: ahaan pandey and aneet padda starrer saiyaara movie breaks records know about worldwide collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.