'चमकीला'च्या यशानंतर इम्तियाज अली यांचा नवा चित्रपट; 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 14:00 IST2025-06-16T13:57:47+5:302025-06-16T14:00:29+5:30

'चमकीला'च्या यशानंतर इम्तियाज अलींचा नवा चित्रपट; कधी होणार प्रदर्शित?

after the success of chamkila imtiaz ali announce new film starring diljit dosanjh sharvari wagh and vedang raina  | 'चमकीला'च्या यशानंतर इम्तियाज अली यांचा नवा चित्रपट; 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

'चमकीला'च्या यशानंतर इम्तियाज अली यांचा नवा चित्रपट; 'हे' कलाकार दिसणार मुख्य भूमिकेत

Imtiaz Ali New Film:बॉलिवूड इंडस्ट्रीला आजवर बरेच सुपरहिट चित्रपट देणाऱ्या इम्तियाज अली (Imtiaz Ali) यांच्या चित्रपटांची वेगळीच क्रेझ आहे. 'अमर सिंह चमकीला'च्या यशानंतर इम्तियाज अली यांनी अभिनेता दिलजीत दोसांझसोबत (Diljit Dosanjh) हातमिळवणी करत नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.  तसेच या चित्रपटातील स्टारकास्ट देखील समोर आली आहे. दरम्यान, 'चमकिला' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. मात्र, यावेळी त्यांचा आगामी चित्रपट हा थेट सिनेमागृहात दाखल होणार आहे. 

एएनआयच्या रिपोर्टनुसार, इम्तियाज अली यांच्या या आगामी चित्रपटाचं शूटिंग २०२५ मध्येच सुरु होणार आहे. तर हा चित्रपट येत्या २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. यामध्ये दिलजीत दोसांझसह पहिल्यांदाच वेदांग रैना आणि शर्वरी वाघ, नसीरुद्दीन शाह  हे कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. इम्तियाज अली यांचा हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार आहे. त्याचबरोबर इम्तियाज अली, ए.आर. रहमान आणि इर्शाद कामिल हे त्रिकूट या चित्रपटाच्या पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ए.आर. रहमान आणि इर्शाद कामिल यांच्यावर आहे. याआधीही तिघांनी 'रॉकस्टार', 'हायवे', 'तमाशा', 'अमर सिंह चमकिला' मध्ये एकत्र काम केलं आहे.

इम्तियाज अली यांच्या 'चमकिला' या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची दाद मिळाली होती. यामध्ये दिलजीतने मुख्य भूमिका साकारली होती शिवाय त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. आता नव्या चित्रपटातून दिलजीत आणि शर्वरीची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत. 

Web Title: after the success of chamkila imtiaz ali announce new film starring diljit dosanjh sharvari wagh and vedang raina 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.