करण जोहरपाठोपाठ करिना कपूरही बनणार रेडिओची होस्ट!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 21:23 IST2018-09-13T21:22:48+5:302018-09-13T21:23:32+5:30
करिनाकडे रेडिओ शोची आॅफर येताच, तिने सर्वप्रथम करण जोहरचा सल्ला घेतला.

करण जोहरपाठोपाठ करिना कपूरही बनणार रेडिओची होस्ट!!
तैमूरच्या जन्माच्या सुमारे दोन वर्षांनंतर करिना कपूर खानने रूपेरी पडद्यावर दमदार एन्ट्री केली. करिनाचा ‘वीरे दी वेडिंग’ हिट झाला. या चित्रपटानंतर करिनाकडे सध्या अनेक चित्रपटांच्या आॅफर्स आहेत. यातील करण जोहरचे ‘गुड न्यूज’ आणि ‘तख्त’ हे दोन सिनेमे तिने साईनही केले आहेत. लवकरच करिना आणखी काही बिग बॅनरचे चित्रपट साईन करणार आहे. पण आमच्याकडे करिनाच्या चाहत्यांसाठी एक वेगळी खबर आहे. होय, लवकरच करिना तिचा मित्र करण जोहरच्या पावलावर पाऊल ठेवत रेडिओवर डेब्यू करणार आहे. लवकरच करिना एक रेडिओ शो होस्ट करताना दिसेल. करिनाचा हा रेडिओ शो येत्या डिसेंबरपासून आॅनएअर होण्याची शक्यता आहे. स्वत: करिनाने याबद्दल खुलासा केलाय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिनाकडे रेडिओ शोची आॅफर येताच, तिने सर्वप्रथम करण जोहरचा सल्ला घेतला. कारण करण सध्या एक रेडिओ शो होस्ट करतोय. साहजिकचं करणच्या प्रोत्साहनानंतर करिना या शोसाठी राजी झाली. करिनाचा हा शो ‘इश्क104.8 एफएम’वर येणार आहे. करिनाचे चाहते या शोद्वारे तिच्या संपर्कात राहू शकतील.