रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट, करिना कपूर,जान्हवी कपूर! करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 09:54 AM2018-08-09T09:54:00+5:302018-08-09T09:55:56+5:30

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने पुन्हा एका नव्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे,‘तख्त’.

karan johars takht stars ranveer singh kareena kapoor alia bhatt jhanvi kapoor | रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट, करिना कपूर,जान्हवी कपूर! करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा!!

रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट, करिना कपूर,जान्हवी कपूर! करण जोहरच्या ‘तख्त’ची घोषणा!!

googlenewsNext

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याने पुन्हा एका नव्या बिग बजेट चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे,‘तख्त’. करणने ट्विटरवर एका पाठोपाठ एक असे अनेक ट्विट करत, याबाबतची माहिती दिली. त्याने केवळ यातील लीड अ‍ॅक्टर्सची नावेचं जाहिर केली नाहीत तर या चित्रपटाचा फर्स्ट लूकही जारी केला.



 

 ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे पे्रम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. ‘धडक’नंतर जान्हवीचा हा दुसरा चित्रपट असेल.
या मल्टीस्टारर चित्रपटाचे संवाद हुसैन हैदरी लिहिणार आहेत. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
‘कलंक’ या चित्रपटानंतर ‘तख्त’ हा करण जोहरचा दुसरा पीरियड ड्रामा असेल. ‘कलंक’ हाही एक ऐतिहासिक चित्रपट आहे. यातही आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन लीड रोलमध्ये आहेत.

Web Title: karan johars takht stars ranveer singh kareena kapoor alia bhatt jhanvi kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.