'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 11:45 IST2026-02-27T11:43:18+5:302026-02-27T11:45:15+5:30
'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिका पादूकोणचा या प्रोजेक्टमधून पत्ता कट! 'हे' आहे कारण

'स्पिरिट' अन् 'कल्की २' नंतर दीपिकाच्या पाठी ग्रहण? 'या' बिग बजेट प्रोजेक्टमधून दाखवला बाहेरचा रस्ता
Deepika Padukone: लखलखत्या हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या साधेपणाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहवणारी व बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. हिंदी सिनेसृ्ष्टीतील आघाडीच्या नायिकांमध्ये दीपिकाचं नाव अव्वल स्थानावर येतं. तिने आजवर अनेक हिट सिनेमे दिले आहेत. येत्या काळातही ती काही बिग बजेट चित्रपटांमध्ये झळकणार आहे.दरम्यान, मागील काही दिवसांपासून दीपिका तिच्या वैयक्तिक आयुष्यासह प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत आहे.दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरिट' मधून एक्झिट घेतल्यानंतर बहुचर्चित 'कल्की २९८९' च्या सीक्वलमधूनही दीपिकाला रिप्लेस करण्यात आलं. यासगळ्या वादानंतर आता अभिनेत्रीच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल मोठी माहिती हाती लागली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दीपिका सध्या मातृत्व सुख अनुभवते आहे. अभिनेत्रीचे दोन मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. पहिला प्रोजेक्ट म्हणजे अल्लू अर्जुन आणि अॅटलीचा 'A6xA22'. आणखी एक चित्रपट म्हणजे शाहरुख खानचा 'किंग'. यामध्ये दीपिकाचा एक खास कॅमिओ असणार आहे. अभिनेत्रीने आधीच चित्रीकरण पूर्ण केलं आहे. अशातच असे वृत्त आहे की दीपिका पदुकोणला एका मोठ्या प्रकल्पातून वगळण्यात आलं आहे.
दरम्यान, मागील काही काळापासून दीपिका पदुकोण'द व्हाईट लोटस'च्या चौथ्या सीझनमध्ये झळकणार असल्याची माहिती समोर आली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार दीपिका आता या शोचा भाग नसल्याचं वृत्त मिळते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि या सीरिजमधून अभिनेत्रीचा पत्ता कट झाल्याचं समजतंय. परंतु, या वृत्तांवर निर्मात्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. शिवाय दीपिकाने सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय घडलं?
'द व्हाईट लोटस' च्या कास्टिंग प्रक्रियेत ऑडिशनसाठी दीपिका पादुकोणला या शोसाठी संपर्क साधण्यात आला. निर्माते देखील कलाकारांना साइन करण्यापूर्वी ऑडिशन्स देण्यास नकार दिला. ज्यामुळे शेवटी तिला 'द व्हाईट लोटस' मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.