दिग्दर्शकाने स्क्रिप्ट न दाखवल्याने अभिनेत्याचा तिळपापड झाला, बॉलिवूडला रामराम केला! आता गाजवतोय साऊथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:14 IST2025-10-31T15:04:41+5:302025-10-31T15:14:29+5:30
दिग्दर्शकाने स्क्रिप्ट न दाखवल्याने अभिनेत्याचा तिळपापड झाला, बॉलिवूडला रामराम केला! कोण आहे तो?

दिग्दर्शकाने स्क्रिप्ट न दाखवल्याने अभिनेत्याचा तिळपापड झाला, बॉलिवूडला रामराम केला! आता गाजवतोय साऊथ
Kamal Haasan : १९७० च्या दशकात पहिल्याच चित्रपटातून स्टारडम मिळवणारे अभिनेते म्हणजे कमल हासन. शालेय वयातच ते अनेक चित्रपटांमध्ये ते बालकलाकार म्हणून झळकले. त्यानंतर त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की लवकरच त्यांना हिंदी चित्रपटांमधूनही ऑफर्स येऊ लागल्या.साऊथ इंडस्ट्रीपासून बॉलिवूडवर अधिराज्य करणारे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. फिल्म इंडस्ट्रीत 1 कोटींचं मानधन घेणारे पहिले सुपरस्टार म्हणून कमल हसन यांना ओळखलं जातं.
कमल हासन यांनी 'एक दुजे के लिए' या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात रती अग्निहोत्री त्यांच्यासोबतीला होत्या. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात प्रतिष्ठित प्रेमकथांवर आधारित चित्रपटांपैकी एक मानला जातो.त्यानंतर सनम तेरी कसम, सागर, 'जरा सी 'जिंदगी', 'सदमा' आणि 'ये तो कमाल हो गया' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. मात्र, लोकप्रियतेच्या शिखरावर असताना त्यांनी इंडस्ट्रीपासून दूर जाणं पसंत केलं. चेन्नईमध्ये स्थायिक होऊन त्यांनी साऊथमध्ये नशीब अजमावलं. एका मुलाखतीत, कमल हासन यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्याचं का थांबवलं याबद्दल खुलासा केला होता.
स्क्रिप्ट मागितल्याने दिग्दर्शक नाराज झाले अन्...
एका प्रोजेक्टदरम्यान, कमल हासन यांची दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यासोबत भेट झाली. एकत्र काम करण्याच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. मात्र, प्रत्यक्षात त्याचे परिणाम वेगळेच झाले. जेव्हा कमल हासन यांनी दिग्दर्शकासोबत स्क्रिप्ट बघण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांच्या त्या वक्तव्यामुळे दिग्दर्शक नाराज झाले. कमल यांच्या सांगण्यानूसार, "माझ्याकडे अमिताभ बच्चन देखील स्क्रिप्ट मागत नाही", असं ते दिग्दर्शक त्यांना म्हणाले होते.या घटनेनंतर त्यांना जाणवलं की हिंदी चित्रपटसृष्टीची काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. यानंतर त्यांनी बॉलिवूडला रामराम करत साऊथ इंडस्ट्रीची वाट धरली.
कमल हासन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अलिकडेच ते ठग लाईफ या चित्रपटामध्ये पाहायला मिळाले. मणीरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री त्रिशा कृष्णन तसेच अभिनेते महेश मांजरेकर देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते.
