दिलजीत दोसांझनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याची 'नो एंट्री'च्या सीक्वलमधून एक्झिट, काय कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 17:19 IST2025-10-12T17:13:19+5:302025-10-12T17:19:49+5:30
दिलजीत दोसांझनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याची 'नो एंट्री'च्या सीक्वलमधून एक्झिट, नेमकं चाललंय काय?

दिलजीत दोसांझनंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्याची 'नो एंट्री'च्या सीक्वलमधून एक्झिट, काय कारण?
No Entry 2 Movie: गेल्या काही महिन्यांपासून बोनी कपूर यांच्या नो एन्ट्री चित्रपटाबद्दल सीक्वलबद्दल इंडस्ट्रीत चर्चा आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या प्रीक्वलला सिनेरसिकांची चांगली दाद मिळाली होती. नवीन कथा आणि नवे चेहरे पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षक देखील या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अनीस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अर्जुन कपूर या कलाकारांची नावे समोर आली होती. मात्र, अलिकडेच या प्रोजेक्टमधून दिलजीत दोसांझने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. असं असतानाच आता या चित्रपटाबद्दल आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री'च्या सीक्वलमधून एक्झिट झाल्यानंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यात आता या चित्रपटातून आणखी एका अभिनेत्याने एक्झिट घेतल्याची माहिती समोर येते आहे. मिडिया रिपोर्टनुसार, अभिनेता वरुण धवनने 'नो एंट्री २' चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काही वैयक्तिक कारणास्तव या प्रोजेक्ट्मधून वरुण धवनने एक्झिट घेतल्याचं कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार, वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'भेडिया २' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या दोन्ही चित्रपटांच्या तारखांमध्ये क्लॅश होत असल्याने अभिनेत्याने हा प्रोजेक्ट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, याबाबत वरुण किंवा निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.