आदित्य रॉय कपूरच्या घरी गिफ्ट्स घेऊन पोहोचली अज्ञात महिला, दरवाजाची बेल वाजवली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:00 IST2025-05-27T14:52:47+5:302025-05-27T15:00:00+5:30
आदित्य रॉय कपूर घरी येऊन बघतो तोच...

आदित्य रॉय कपूरच्या घरी गिफ्ट्स घेऊन पोहोचली अज्ञात महिला, दरवाजाची बेल वाजवली अन्...
सैफ अली खानच्या घरात चोर घुसल्याची घटना घडली होती सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं. आता अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या (Aditya Roy Kapoor) मुंबईतील घरी एक अज्ञात महिला घुसल्याची घटना घडली आहे. तेव्हा आदित्य घरी नव्हता. मात्र महिलेच्या एका दाव्यानंतर तिला सरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नक्की काय घडलं वाचा.
आदित्य रॉय कपूर मुंबईतील बांद्रा पश्चिम येथे रिजवी कॉम्प्लेक्समध्ये राहतो. काल सोमवारी संध्याकाळी ६ वाजता त्याच्या घराची बेल वाजली. हाऊस हेल्प संगीता पवारने दरवाजा उघडला. आदित्य तेव्हा शूटिंगसाठी बाहेर होता. दरवाजा उघडताच महिलेने 'आदित्य घरी आहे का? असं विचारलं. संगीता 'हो' असं म्हणाली. तर त्या महिलेने मी आदित्यसाठी कपडे आणि गिफ्ट्स आणले असल्याचं सांगितलं. ते ऐकून संगिताने महिलेला परत जा असं सांगितलं. मात्र ती महिला तिथून हलायलाच तयार नव्हती. तिने तिथेच थांबण्याचा हट्ट धरला.
आदित्य घरी येताच त्याने या महिला पाहिलं आणि त्याने तिला ओळखलंच नाही. त्याने लगेच सोसायटी मॅनेजरला बोलवलं आणि खार पोलिसांना कळवलं. पोलिसांनी चौकशी केली. महिलेचं नाव गजाला झकारिया सिद्दीकी असल्याचं समोर आलं. ती दुबईवरुन आली आहे. तिने पोलिसांना नीट उत्तरं दिली नाही त्यामुळे त्यांना तिच्यावर शंका आली. संगिता पवारच्या तक्रारीवरुन त्या महिलेविरोधात कलम ३३१(२) अंतर्गत अवैधरित्या कोणाच्याही घरात घुसण्याची केस दाखल केली.
आदित्य रॉय कपूर आगामी 'मेट्रो..इन दिनो' सिनेमात दिसणार आहे. अनुराग बसू दिग्दर्शित या सिनेमा सारा अली खानसोबत तो झळकणार आहे. शिवाय सिनेमात इतरही मोठी स्टारकास्ट आहे.