Aditi Rao Hydri : कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, बॉयफ्रेंड सिद्धार्थही झाला फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 14:04 IST2023-05-25T14:00:38+5:302023-05-25T14:04:04+5:30
अभिनेत्री आदिती राव हैदरीने कान्समध्ये आपल्या सौंदर्याची जादू पसरली.

Aditi Rao Hydri : कान्समध्ये आदिती राव हैदरीचा जलवा, बॉयफ्रेंड सिद्धार्थही झाला फिदा!
फ्रान्सच्या रिव्हेरा फेस्टिव्हलमध्ये सध्या कान्स फेस्टिव्हल (Cannes Film Festival 2023) उत्साहात सुरु आहे. बॉलिवूडमधून यंदा सारा अली खान ते ऐश्वर्या राय पर्यंत अनेक अभिनेत्रींनी आपला जलवा दाखवला. अभिनेत्री आदिती राव हैदरीने (Aditi Rao hydri) देखील आपल्या सौंदर्याची जादू पसरली. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचीच चर्चा आहे. आदितीच्या फोटोवर रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थही फिदा झाला आहे.
आदितीने यंदा कान्ससाठी स्पेशल आऊटफिट परिधान केले होते. डे आऊटसाठी तिने ब्लू oscar de la renta outfit ची निवड केली. या लुकमध्ये ती डिस्नी प्रिंन्सेस पेक्षा काही कमी दिसत नव्हती. या फोटोंना कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "परत भेटून छान वाटलं कान्स!'
आदितीच्या पोस्टवर चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत. मात्र त्या एका स्पेशल व्यक्तीची कमेंट चर्चेत आहे. ते म्हणजे आदितीचा रुमर्ड बॉयफ्रेंड सिद्धार्थ. तोही आदितीच्या कान्स लुकच्या प्रेमातच पडला. 'ओह माय' अशी कमेंट त्याने केली आहे.आदिती आणि सिद्धार्थने 2021 साली रिलीज झालेल्या 'महा समुद्रम' सिनेमात काम केले होते. तेव्हाच दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
आदिती सध्या तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. विजय सेतुपती, अरविंद स्वामी सोबत ती 'गांधी टॉक्स' मध्ये दिसणार आहे. याशिवाय संजय लीला भन्साळीच्या 'हीरामंडी'मध्ये तिची महत्वाची भूमिका आहे. नुकतीच तिची 'ताज:डिव्हायडेड बाय ब्लड' सिरीजमध्ये दिसली.यात तिने अनारकलीची भूमिका साकारली होती.