अतरंगी स्टाइलमुळे ट्रोल झाली ही अभिनेत्री, चेहऱ्यावर परिधान केला हिऱ्यांनी जडलेला मास्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 13:01 IST2021-04-10T13:01:32+5:302021-04-10T13:01:59+5:30
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा चेहऱ्यावर हिऱ्यांनी जडलेला मास्कचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

अतरंगी स्टाइलमुळे ट्रोल झाली ही अभिनेत्री, चेहऱ्यावर परिधान केला हिऱ्यांनी जडलेला मास्क
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती तिच्या स्टाइलिश लूकसाठी ओळखली जाते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तिचे चाहते हैराण झाले आहेत. यात उर्वशी रौतेलाने चेहऱ्यावर हिऱ्यांनी जडलेला मास्क घातला आहे. या दागिन्यामुळे ती सुंदर दिसण्याऐवजी विचित्र दिसते आहे. तिची ही अतरंगी स्टाइलमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
खरेतर उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती चेहऱ्यावर डायमंडचा मास्क परिधान केलेला दिसते आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, डायमंड फुल मास्करेड. हे खूप भारी भक्कम होते. त्यासाठी मला दोष देऊ नका.
उर्वशी रौतेलाची ही अतरंगी स्टाइल पाहून काहींनी तिची प्रशंसा केली तर काहींनी तिला ट्रोल केले. एका युजरने म्हटले की, काहीतरी गडबड झाली आहे कारण असा लूक असू शकत नाही. तर दुसऱ्या युजरने म्हटले की तूम्ही खूप सुंदर दिसत आहात.
उर्वशी रौतेलाने 'सिंह साहब दी ग्रेट' चित्रपटातून करिअरची सुरूवात केली होती. यात ती सनी देओलसोबत झळकली होती. याशिवाय तिने सनम रे, हेट स्टोरी, पागलपंती, वर्जिन भानुप्रिया या चित्रपटात काम केले आहे.
आता ती तमीळ चित्रपटात काम करते आहे. यात ती तमीळ अभिनेता सरवननसोबत दिसणार आहे.