साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडलं, आता अक्षय कुमारची हिरोईन पुन्हा चढणार बोहल्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:50 IST2025-10-10T13:47:51+5:302025-10-10T13:50:46+5:30
अक्षय कुमारच्या सिनेमातून काम केलेली प्रसिद्ध अभिनेत्री आता ४२ व्या वर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे सर्व चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे

साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडलं, आता अक्षय कुमारची हिरोईन पुन्हा चढणार बोहल्यावर
वयाच्या ४२ व्या वर्षी एक प्रसिद्ध अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे. १० वर्षांपूर्वी या अभिनेत्रीचं लग्न मोडलं होतं. आता पुन्हा एकदा ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे त्रिशा कृष्णन. बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. त्रिशा लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. कोण आहे तिचा होणारा नवरा?
आई-बाबांनी त्रिशासाठी बघितला मुलगा
मीडिया रिपोर्टनुसार, त्रिशा कृष्णन चंदीगढमधील एका प्रसिद्ध बिझनेसमनसोबत लग्न करणार आहे. तो नक्की कोण आहे, याबद्दल अद्याप माहिती मिळाली नसली तरीही त्रिशाच्या कुटुंबीयांनी या बिझनेसमनला जावई म्हणून पूर्णपणे पसंती दिली आहे. त्रिशाच्या पालकांनी दोन्ही कुटुंबांच्या संमतीने तिचं लग्न निश्चित केलं आहे. येत्या काही महिन्यात त्रिशा आणि तो व्यावसायिक बोहल्यावर चढण्याची होण्याची शक्यता आहे. मात्र, त्रिशा किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
याआधी मोडलं होतं लग्न
त्रिशा कृष्णनने यापूर्वी २०१५ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती वरुण मनियन यांच्याशी साखरपुडा केला होता, पण काही महिन्यांतच त्यांचं नातं तुटले. त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. पुढे त्रिशाने अभिनयावर लक्ष केंद्रित केले. २०२० मध्ये एका मुलाखतीत त्रिशाने भविष्यातील लग्नाच्या योजनेबद्दल बोलताना सांगितले होते की, तिला लग्नाची घाई नाही आणि योग्य वेळी त्याबाबत ती निर्णय घेईल.
२०२४ हे वर्ष त्रिशासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरलं आहे. 'पोन्नियिन सेल्वन' मालिकेत 'कुंडवई'च्या भूमिकेत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली, तर 'लियो'मध्येही तिने केलेल्या अभिनयाचं कौतुक झाले. या वर्षी रिलीज झालेल्या कमल हासनच्या 'ठग लाईफ' सिनेमा त्रिशा झळकली होती. त्रिशाच्या लग्नाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.