"हे काय केलंस?" Animal मधील इंटिमेट सीन पाहून तृप्ती डिमरीच्या आईवडिलांनी दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:57 IST2023-12-10T14:54:51+5:302023-12-10T14:57:13+5:30
Animal मधून तृप्ति डिमरी नॅशनल क्रश बनली आहे.

"हे काय केलंस?" Animal मधील इंटिमेट सीन पाहून तृप्ती डिमरीच्या आईवडिलांनी दिली प्रतिक्रिया
बॉलिवूडमध्ये Animal सिनेमाबद्दल अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना सिनेमा आवडलाय तर काहींनी सिनेमाला नावं ठेवली आहेत. तरी सिनेमाने कमाईच्याबाबतीत धुमाकूळ घातलाय. आतापर्यंत चित्रपटाने ६०० कोटींहून जास्त बिझनेस केला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल मुख्य कलाकार असले तरी एका सहअभिनेत्रीने सिनेमातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलंय. ती म्हणजे अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri). Animal रिलीजनंतर तृप्ती नॅशनल क्रश बनली आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीने Animal मध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत. सिनेमातील तिची भूमिका खूपच छोटी आहे मात्र तिची रणबीर कपूरसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. Animal मध्ये तृप्तीने रणबीर कपूरसोबत तृप्तीने दिलेला इंटिमेट सीन पाहून सर्वच आश्चर्य व्यक्त आहेत. इतकंच काय तृप्तीच्या आईवडिलांनीही तिच्या या सीन्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड हंगामाशी बोलताना तृप्ती म्हणाली,'माझे आईवडील थोडे शॉक झाले. ते मला म्हणाले की आम्ही सिनेमांमध्ये कधीच असं काही पाहिलं नाही आणि तू ते करुन दाखवलंस. माझ्या आईवडिलांना त्या सीनबद्दल थोडा आक्षेप वाटला. त्यांना ते स्वीकारणं जरा अवघड गेलं. पण ते खूपच प्रेमळ आहेत. तू असं नव्हतं करायला पाहिजे, पण ठीके काही हरकत नाही. आईवडील म्हणून आम्हाला हे वाटलं, अशी त्यांची प्रतिक्रिया होती.'
तृप्ती डिमरीचा Animal हा पहिला सिनेमा नाही. तिने लैला मजनू चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. याशिवाय 'बुलबुल','कला' या सिनेमांनी तिला लोकप्रियता दिली होती. पण Animal सिनेमामुळे ती जास्त प्रसिद्धीझोतात आली. यानंतर तृप्ती 'मास महाराजा' मधून साऊथमध्ये डेब्यू करणार आहे.