६ मिनिटांसाठी आली आणि तब्बल ६ कोटी घेऊन गेली? अभिनेत्रीचं मानधन ऐकून नेटकरी अवाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:00 IST2026-01-07T11:54:56+5:302026-01-07T12:00:27+5:30
एवढं मानधन तर अक्षय खन्नाला धुरंधरसाठीही मिळालं नव्हतं. एका सहा मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी अभिनेत्रीला कोटींच्या घरात मानधन मिळालं आहे

६ मिनिटांसाठी आली आणि तब्बल ६ कोटी घेऊन गेली? अभिनेत्रीचं मानधन ऐकून नेटकरी अवाक
काही बॉलिवूड कलाकार सिनेमांसाठी कोटींच्या घरात मानधन घेतात. या कलाकारांचा मानधनाचा आकडा ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावतात. पण एक अशी अभिनेत्री आहे जी फक्त ६ मिनिटांसाठी परफॉर्मन्स करायला आली आणि तब्बल ६ करोड घेऊन गेली. इतकं मानधन तर 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नालाही नव्हतं. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या
६ मिनिटांसाठी ६ कोटी मानधन घेणारी ती कोण?
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे तमन्ना भाटिया. अभिनेत्रीतमन्ना भाटिया हिने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात केलेल्या एका डान्स परफॉर्मन्सची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचवरील 'लास ओलास' बीच क्लबमध्ये एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात तमन्नाने तिच्या गाजलेल्या गाण्यांवर जबरदस्त डान्स केला, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, तमन्नाने या कार्यक्रमात केवळ सहा मिनिटांचे सादरीकरण केले आणि त्यासाठी तिने तब्बल सहा कोटी रुपये मानधन आकारले. याचाच अर्थ तिने प्रत्येक मिनिटासाठी एक कोटी रुपये कमावले आहेत. इतक्या कमी वेळेसाठी एवढी मोठी रक्कम घेतल्यामुळे मनोरंजन विश्वात सध्या तमन्नाची चर्चा आहे. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री एका पूर्ण चित्रपटासाठी ५ ते ६ कोटी रुपये मानधन घेतात, मात्र तमन्नाने केवळ एका छोट्या परफॉर्मन्ससाठी इतकी रक्कम घेतल्याने तिची लोकप्रियता किती वाढलीये, हेच कळून येतं.
तमन्नाने अलीकडच्या काळात 'स्त्री २' मधील 'आज की रात' आणि 'जेलर' मधील 'कावला' या गाण्यांमधून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. याच लोकप्रियतेमुळे अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स आणि खासगी पार्ट्यांमध्ये डान्स करण्यासाठी तमन्नाला बोलावलं जातं. अर्थात या फक्त चर्चा असून तमन्ना किंवा तिच्या टीमकडून अद्याप याविषयी काहीही अधिकृत खुलासा झाला नाहीये.