अभिनेत्री तब्बू झळकणार या प्रसिद्ध हॉलिवूड वेबसीरिजमध्ये, दिसणार मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:49 PM2024-05-22T15:49:45+5:302024-05-22T15:50:25+5:30

Tabu : अभिनेत्री तब्बू बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शेवटची ती क्रू सिनेमात पाहायला मिळाली.

Actress Tabu will be seen in the lead role in this famous Hollywood web series | अभिनेत्री तब्बू झळकणार या प्रसिद्ध हॉलिवूड वेबसीरिजमध्ये, दिसणार मुख्य भूमिकेत

अभिनेत्री तब्बू झळकणार या प्रसिद्ध हॉलिवूड वेबसीरिजमध्ये, दिसणार मुख्य भूमिकेत

अभिनेत्री तब्बू (Tabu) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. शेवटची ती क्रू सिनेमात पाहायला मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता ती 'डून: प्रोफेसी' या मॅक्स सीरिजमध्ये दिसणार आहे. व्हरायटीच्या अहवालानुसार, ही सीरिज २०१९ मध्ये लाँच करण्यात आली होती आणि २०२३ मध्ये क्रिएटिव्ह रीसेटसह अनेक बदल केले गेले आहेत. या सीरिजच्या प्रीमियरची तारीख अद्याप ठरलेली नाही. या सीरिजमधील प्रमुख भूमिकांपैकी एक असलेल्या सिस्टर फ्रान्सिस्काची भूमिका ती साकारणार आहे.

मॅक्सची ही वेब सिरीज सिस्टरहुड ऑफ ड्युन नावाच्या मालिकेपासून प्रेरित आहे, जी ब्रायन हर्बर्ट आणि केविन जे अँडरसन यांनी लिहिली आहे. या कादंबरीत सैन्यात लढणाऱ्या दोन बहिणींचा उल्लेख आहे. हे सैन्य मानवतेच्या विरोधात आहे. या दोन बहिणींपैकी एकाची भूमिका तब्बू साकारणार आहे. तिच्या पात्राचे वर्णन 'बलवान, बुद्धिमान आणि आकर्षक' असे करण्यात आले आहे. वर्णनात लिहिले आहे की, "एकेकाळी सम्राटाचे खूप प्रेम होते, तिच्या राजवाड्यात परत आल्याने राजधानीतील शक्ती संतुलन बिघडले."

या सीरिजमध्ये दिसणार हे कलाकार
'डून: प्रोफेसी'मध्ये एमिली वॉटसन, ऑलिव्हिया विल्यम्स, ट्रॅव्हिस फिमेल, जोहडी मे, मार्क स्ट्रॉन्ग, सारा सोफी बौस्निना, क्लो ली, जोश ह्यूस्टन, जेड अनौका, एडवर्ड डेव्हिस, फॉइलीन कनिंगहॅम, एओईफ हिंड्स, शालोम फ्रँक्लिन आणि ब्रुने यांच्या भूमिका आहेत. ही मालिका मॅक्स आणि लिजेंडरी टेलिव्हिजनने सह-निर्मित केली आहे.

आत्तापर्यंत दोन 'ड्युन' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत आणि लोकांना ते खूप आवडले आहेत. दुसरा चित्रपट 'डून : पार्ट टू' मार्चमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. एकूणच, दोन्ही चित्रपटांनी ९१८ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचा तिसरा भागही येत आहे, ज्यावर सध्या काम सुरू आहे.

Web Title: Actress Tabu will be seen in the lead role in this famous Hollywood web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tabuतब्बू