Video: सनी लिओनी झाली Oops मूमेंटची शिकार; मदतीला पुढे आला पती, सावरली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 15:38 IST2026-02-04T15:32:17+5:302026-02-04T15:38:13+5:30

या कार्यक्रमादरम्यान सनी लिओनीला एका 'Oops Moment'चा सामना करावा लागला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

actress sunny leone faced oops moment with husband handled situation video viral | Video: सनी लिओनी झाली Oops मूमेंटची शिकार; मदतीला पुढे आला पती, सावरली परिस्थिती

Video: सनी लिओनी झाली Oops मूमेंटची शिकार; मदतीला पुढे आला पती, सावरली परिस्थिती

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या 'स्प्लिट्सविला १६' मुळे चर्चेत आहे. १ फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित एका ग्लॅमरस कार्यक्रमात ती पती डॅनियल वेबरसोबत सहभागी झाली होती. मात्र, या कार्यक्रमादरम्यान सनीला एका 'Oops Moment 'चा सामना करावा लागला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सनीच्या पतीने ही गोष्ट शांतपणे हाताळली. 

काय घडले नक्की?

सनी लियोनीने या कार्यक्रमासाठी गडद तपकिरी रंगाचा एक सुंदर 'फ्लोअर-लेंथ' गाऊन परिधान केला होता. स्टायलिश गाऊन आणि आकर्षक दागिन्यांमध्ये सनी अतिशय सुंदर दिसत होती. ती पतीसोबत आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर पोज देत तिचं लक्ष कपड्यांमध्ये गेलं. फोटोशूट सुरू असताना तिला काहीसं अवघडल्यासारखं वाटत होतं. म्हणून ती थोडी बाजूला झाली.


तिचा पती डॅनियल वेबरने तात्काळ सनीची अवस्था ओळखून लगेच हजरजबाबीपणा दाखवत परिस्थिती सावरली. डॅनियलने शांतपणे सनीला याबद्दल इशारा केला. डॅनियलच्या साथीने सनीने तिचा गाऊन ठीक केला. पुढे सनीने पुन्हा पापाराझींसमोर फोटोशूट करुन ती पतीसोबत आत निघून गेली. सनीचा पती डॅनियसने ज्या शांतपणे आणि संयमाने परिस्थिती सावरली त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

सनीने नेहमीच मुलाखतींमध्ये नमूद केले आहे की, तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात डॅनियल नेहमीच ढाल बनून तिच्या पाठीशी उभा राहिला आहे. मुंबईतील या घटनेनंतर डॅनियलने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली, त्यावरून सनीचे बोलणे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. सनीचे चाहते तिच्या या प्रोफेशनल वागण्याचे आणि डॅनियलच्या सपोर्टिव्ह स्वभावाचे भरभरून कौतुक करत आहेत.

Web Title : सनी लियोनी का ऊप्स मोमेंट: पति ने आकर संभाली स्थिति

Web Summary : मुंबई में एक कार्यक्रम के दौरान सनी लियोनी को ऊप्स मोमेंट का सामना करना पड़ा। उनके पति, डेनियल वेबर ने तुरंत स्थिति को संभाला। फोटोशूट के दौरान डेनियल ने सनी को उनकी पोशाक के बारे में सतर्क किया, जिससे वह आसानी से ठीक कर पाईं। डेनियल के सहयोग की सराहना हुई।

Web Title : Sunny Leone's Oops Moment: Husband Steps In, Saves the Day

Web Summary : Sunny Leone faced an 'Oops Moment' at an event, but her husband, Daniel Weber, quickly and calmly resolved the situation. He alerted her to a wardrobe issue with her gown during a photoshoot, allowing her to fix it gracefully. Daniel's support was widely praised.