दीपिकानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, पाच महिन्यांची गरोदर; हटके कॅप्शनने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 14:58 IST2024-08-16T14:57:27+5:302024-08-16T14:58:03+5:30
अभिनेत्रीने हटके पोस्ट शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

दीपिकानंतर 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, पाच महिन्यांची गरोदर; हटके कॅप्शनने वेधलं लक्ष
बॉलिवूडमध्ये दीपिका पदुकोण पुढील महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. तर नुकतंच टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनेही गुडन्यूज दिली. आता बॉलिवूडमधील आणखी एका अभिनेत्रीने प्रेग्नंसी जाहीर केली आहे. नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली. विशेष म्हणजे या पोस्टसोबत तिने लिहिलेलं कॅप्शनही मजेशीर आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
'प्यार का पंचनामा', 'सोनू के टिटू की स्वीटी' या सिनेमांमध्ये दिसलेली अभिनेत्री सोनाली सहगलने (Sonnalli Seygall) आज सोशल मिडिया पोस्ट करत गुडन्यूज दिली. सोनालीने तीन फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत बेबी बंप दाखवत ती खाताना दिसत आहे. तर बाजूला तिचा नवरा बिअर पीत दुसऱ्या हातात दुधाची बॉटल घेऊन त्याकडे पाहत आहे. तर त्यांचा पाळीव कुत्रा सोनालीकडे पाहताना दिसतोय. दुसऱ्या फोटोत सोनाली पुस्तक वाचत आहे. तर तिचा पाळीव कुत्रा how to be a big brother या पुस्तकाकडे बघताना दिसतोय. तिसऱ्या फोटो टेबलवर कॉफी आणि 'द डेली डॅड' हे पुस्तक ठेवलेलं आहे. या फोटोंसोबत सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'बिअर बॉटल्स ते बेबी बॉटल्स...आशेषचं आयुष्य बदलणार आहे. माझ्यासाठी तर गोष्टी तशाच आहेत. आधी मी माझ्यापुरतं खायचे आता दोन जणांसाठी खाणार आहे. दरम्यान शमशेर मोठा भाऊ बनण्यासाठी पुस्तकातून टीप्स घेत आहे. खूप आनंद होतोय आणि ग्रेटफुल वाटतंय. आम्ही तुमच्या प्रार्थनांमध्ये राहो. डिसेंबर २०२४!
सोनाली पाच महिन्यांची गरोदर आहे. 7 जून 2023 रोजी ती बिझनेसमन आशिष सजनानीसोबत लग्नबंधनात अडकली. त्यापूर्वी कपल पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नापर्यंत त्यांनी रिलेशनशिप गुपित ठेवलं होतं. लग्नानंतर त्यांनी रोमँटिक फोटो शेअर करायला सुरुवात केली होती.