इंटीमेट सीन्समुळे चित्रपट नाकारल्यानं मोठे प्रोजेक्ट हातून गेले; आता अभिनेत्रीला होतोय पश्चाताप, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 10:26 IST2025-10-14T10:24:54+5:302025-10-14T10:26:20+5:30
बोल्ड सीनमुळे चित्रपट नाकारले, करिअरला बसला फटका? बॉलिवूड अभिनेत्रीला होतोय पश्चाताप, म्हणाली-"घरच्यांमुळे..."

इंटीमेट सीन्समुळे चित्रपट नाकारल्यानं मोठे प्रोजेक्ट हातून गेले; आता अभिनेत्रीला होतोय पश्चाताप, म्हणाली...
Sonam Bajwa: हल्ली चित्रपट असो किंवा टीव्ही मालिका पडद्यावर इंटीमेट सीन्स अगदी सर्सास दाखवले जातात. त्यामुळे कथानकानुसार इंटीमेट सीन्स द्यावे लागतात. मात्र, हे सीन्स शूट करताना अनेकांना दडपण येतं.कुटुंबीयांची प्रतिक्रिया, सहकलाकारांची साथ सुद्धा त्यासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे बऱ्याचदा लोकांच्या, कुटुंबीयांच्या विचारामुळे काही कलाकार अशा ऑफर्स नाकारतात. याबाबत नुकतंच अभिनेत्री सोनम बाजवाने भाष्य केलं आहे. चित्रपटातील किसिंग सीन आणि इंटीमेट सीन्समुळे बऱ्याच भूमिका नाकारल्या असा खुलासा तिने केला आहे.
अलिकडेच सोनम बाजवाने 'फिल्म कंपैनियन' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या अभिनय प्रवासावर भाष्य केलं. तसंच इंटीमेट सीन्समुळे तिने काही चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या,असंही सांगितलं.त्यावेळी ती म्हणाली, "मी काही बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. कारण, मनात हाच विचार यायचा की पंजाबमधील माझे प्रेक्षक, चाहत्यांना हे असं चालेलं का आपल्याकडे चित्रपट हे संपूर्ण कुटुंबाबरोबर पाहिले जातात. याआधी मला चित्रपटांमध्ये किसींग सीन वगैरे करण्याची भीती वाटायची. कारण, लोक काय विचार करतील?हे फक्त अभिनयासाठी आहे,याबाबत माझे कुटुंबीय समजून घेतील का?"
मग पुढे सोनमने सांगितलं, काही वर्षांपूर्वी मी माझ्या आई-बाबांजवळ याबद्दल चर्चा केली. त्यावर ते म्हणाले, "हे फक्त चित्रपटांसाठीच असेल तर ठीक आहे. त्याचं ते बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मग मी याबद्दल त्यांच्याशी याआधी का बोलले नाही, असा विचार डोक्यात आला. मला त्यांच्याशी यावर बोलायला लाज वाटत होती, पण ते त्यांनी अगदी सहज स्विकारलं." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये केला.
दरम्यान, सोनम बाजवाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने २०१९ मध्ये 'बाला' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर ती 'स्ट्रीट डान्सर-३', 'हाऊसफुल्ल-५' तसेच बागी-४ चित्रपटांमध्ये झळकली आहे. लवकरच ती 'एक दीवाने की दीवानियत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.