'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 10:52 IST2020-08-03T10:51:55+5:302020-08-03T10:52:05+5:30

आता प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवालने ट्विट करून दिशा सालियन आणि सुशांतच्या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Actress Simi Garewal demans Disha Salian and Sushant death case CBI investigation | 'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी!

'दिशा सालियन केसमधून सुशांत केसचं सत्य समोर येऊ शकतं', सिमी ग्रेवालची सीबीआय चौकशीची मागणी!

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये रोज नवीन खुलासे होत आहेत. रोज नवीन संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत. सुशांतने आत्महत्या करण्याच्या काही दिवसांआधी त्याची मॅनेजर  दिशा सालियनने आत्महत्या केली होती. दिशा आत्महत्येमुळे सुशांत घाबरला होता, असा उल्लेख त्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीतही आहे. आता प्रसिद्ध अभिनेत्री सिमी ग्रेवालने ट्विट करून दिशा सालियन आणि सुशांतच्या केसची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

सिमी ग्रेवाल यांनी ट्विट करून सांगितले की, या केसमध्ये दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी जोर देऊन म्हणाल्या की, या केसला इग्नोर का केलं जातंय? सिमी ग्रेवाल यांचं म्हणणं आहे की, दिशाच्या मृत्यूची चौकशी सुशांतच्या केसशी संबंधित षडयंत्रापर्यंत देऊन जाऊ शकते.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'दिशाच्या मृत्यूची चौकशी आवर्जून व्हायला पाहिजे. ही केस इग्नोर का केली जात आहे? या केसमधून सुशांतच्या केसशी संबंधित सत्य समोर येऊ शकतं. सुशांत केसची सीबीआय चौकशी गरजेची आहे. आम्हाला सत्य हवंय. आम्ही गप्प बसू शकत नाही'.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मित्राने सांगितले होते की, जेव्हा सुशांत सिंह राजपूतला त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनबाबत माहिती मिळाली. तेव्हा तो फार डिस्टर्ब झाला होता. त्यात त्यांचं नाव येत असल्याने तो घाबरला होता.  बातम्यांमुळे सुशांत अधिक प्रभावित झाला. सुशांतने विचारले होते की, या सगळ्यात त्याचं नाव का घेतलं जात आहे? याच कारणाने सुशांत चिंतेत होता, असं त्याचा मित्र सुशांतने सांगितलं. सुशांत सांगत होता की, दिशा फार कमी काळासाठी त्याची मॅनेजर होती आणि तिला तो केवळ एकदाच भेटला होता.

हे पण वाचा :

आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सुशांत गुगलवर सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी!!

खात्यातून पूजेसाठीही पैसे काढले; मात्र पूजा झालीच नाही

Sushant Singh Rajput death case: मुंबई पोलीस फक्त प्रसिद्धीसाठी तपास करतायेत, केंद्रीय मंत्र्यांचा गंभीर आरोप

Web Title: Actress Simi Garewal demans Disha Salian and Sushant death case CBI investigation