आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सुशांत गुगलवर सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 10:15 AM2020-08-03T10:15:38+5:302020-08-03T10:16:55+5:30

बड्या पोलिस अधिका-याचा दावा

sushant singh rajput google his name before suicide | आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सुशांत गुगलवर सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी!!

आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सुशांत गुगलवर सतत सर्च करत होता ‘या’ तीन गोष्टी!!

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील केके सिंग, बहीण मीतू सिंग आणि नीतू यांचा जबाब नोंदवला गेला होता.

सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या का केली? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असताना आता या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. सुशांतने आत्महत्याच केली, असे मुंबई पोलिसांनी कधीच जाहिर केले होते. मात्र सुशांतचे कुटुंबीय, त्याचे तमाम चाहते आणि आता बिहार पोलिस हे मानायला तयार नाहीत. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एका बड्या अधिकाºयाने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 
होय, सुशांत आत्महत्येच्या आठवडाभरापूर्वी सतत तीन गोष्टी गुगलवर सर्च करत होता, अशी माहिती या अधिकाºयाने दिली आहे. या तीन गोष्टी कोणत्या तर स्वत:चे नाव, त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियानचे नाव आणि स्वत:चा आजार.

इंडियन एक्स्प्रेसने या अधिका-याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, 14 जून म्हणजेच ज्या दिवशी सुशांतने आत्महत्या केली, त्या दिवशीही त्याने गुगलवर स्वत:चे नाव सर्च केले होते. अधिका-याने केलेल्या दाव्यानुसार, सुशांतचा मोबाईल आणि लॅपटॉपच्या फॉरेन्सिक रिपोर्टमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
सुशातने आत्महत्या केली, त्याच्या काही दिवस आधी त्याची एक्स- मॅनेजर दिशा हिने आत्महत्या केली होती. यानंतर आठवडाभराने सुशांतनेही स्वत:ला संपवले. सुशांत डिप्रेशनमध्ये होता, असे मानले जात आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचे वडील केके सिंग, बहीण मीतू सिंग आणि नीतू यांचा जबाब नोंदवला गेला होता. तेव्हा त्यांनी कोणावरही आरोप केला नव्हता वा कुठल्याप्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 40 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत तीन मानसोपचार तज्ज्ञांचा जबाबही नोंदवला आहे.
 
 

Web Title: sushant singh rajput google his name before suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.