अश्लील सिनेमात काम करुन कमावले पैसे, सलमान खानच्या 'या' हिरोईनविरोधात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 17:51 IST2025-08-06T17:49:02+5:302025-08-06T17:51:44+5:30
सलमान खान, आमिर खान, अजय देवगण यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केलेल्या अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अश्लील सिनेमात काम करुन कमावले पैसे, सलमान खानच्या 'या' हिरोईनविरोधात तक्रार दाखल
शाहरुख, आमिर खान आणि अजय देवगण यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्रीविरोधात गंभीर आरोप लागल्याने तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही अभिनेत्री आहे श्वेता मेनन. श्वेतावर अश्लील चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करून आर्थिक फायदा घेऊन बक्कळ पैसा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात केरळमधील कोच्ची पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात FIR नोंदवण्यात आली आहे. ही तक्रार सामाजिक कार्यकर्ते मार्टिन मेनाचेरी यांनी दाखल केली आहे.
मार्टिन यांनी आरोप केला की श्वेता मेननने अश्लील दृश्य असलेल्या काही चित्रपटांमध्ये आणि जाहिरातींमध्ये काम केलं असून त्यामुळे समाजावर वाईट परिणाम होत आहे. ‘रथिनिर्वेदम्’, ‘पलेरी मानिक्यम’ आणि ‘कलिमण्णू’ हे तिचे काही चित्रपट असून, या चित्रपटांमध्ये वादग्रस्त आणि अश्लील दृश्ये दाखवली गेल्याचा दावा करण्यात आला आहे. शिवाय एका कंडोमच्या जाहिरातीतही श्वेता आक्षेपार्ह आणि अश्लील हावभाव करताना दिसली असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. या दृश्यांचा काही लोक चुकीच्या पद्धतीने वापर करत असल्याने पॉर्नसाइट्सवर ते प्रसारित होत असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर श्वेता मेननकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे सध्या ती मल्याळम चित्रपट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या तयारीत आहे. याच दरम्यान ही तक्रार झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. श्वेताने अजय देवगण-आमिर खानच्या 'इश्क' सिनेमात काम केलं आहे. याशिवाय सलमान खानच्या 'बंधन' सिनेमात ती झळकली होती. श्वेतावर हा गंभीर आरोप लागल्याने सर्वांना धक्का बसला आहे.