'धुरंधर' अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची पोस्ट; म्हणाली, "पुन्हा जोडी म्हणून काम करायची संधी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:43 IST2025-12-18T15:42:49+5:302025-12-18T15:43:55+5:30
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री

'धुरंधर' अक्षय खन्नाच्या ऑनस्क्रीन पत्नीची पोस्ट; म्हणाली, "पुन्हा जोडी म्हणून काम करायची संधी..."
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्री सौम्या टंडन 'धुरंधर'मध्ये दिसली. या आयकॉनिक सिनेमाचा भाग असल्याने सौम्या चांगलीच खूश आहे. सिनेमात तिने अक्षय खन्नाच्या म्हणजेच रहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारली. 'धुरंधर'ला मिळणारा प्रतिसाद पाहून ती भारावून गेली आहे. तिने सिनेमाचे काही बीटीएस फोटो शेअर करत मोठी पोस्ट केली आहे.
सौम्याने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या फोटोबद्दल ती लिहिते, "सिनेमासाठी मी शूट केलेला हा पहिलाच सीन होता. अमृतसरमध्ये रहमान डकैतची हवेली बनवण्यात आली होती. ही गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट आहे. मी एकदम नर्वस आणि आतुर होते. पहिल्या दिवशी सकाळीच माझा सीन अक्षय खन्नासोबत होता. तो बदला घेण्याच्या भावनेतून शांततेत सिगारेट पेटवत असतो. तो खरोखर जादुई आहे. आमचं तसं क्वचितच बोलणं व्हायचं पण जसा कॅमेरा ऑन व्हायचा तेव्हा लगेच कनेक्शन जाणवायचं. मला खरंच असं वाटतं की आमची केमिस्ट्री खूप छान आहे. त्याच्यासारखा सहकलाकार असावा हे अनेकांचं स्वप्नच असतं. खूप चांगला कलाकार ज्याच्याकडून बरंच काही शिकायला मिळतं. त्याच्यासारख्या कमाल कलाकाराबरोबर काम करण्याचा आनंद वेगळाच आहे. मला आशा आहे जोडी म्हणून मला पुन्हा कधीतरी त्याच्यासोबत काम करायची संधी मिळेल. मी प्रार्थना करतेय."
'धुरंधर'सिनेमातील अक्षय खन्नाच्याच परफॉर्मन्सची जोरदार स्तुती होत आहे. सौम्याची जोडी अक्षयसोबतच असल्याने तिने आपला आनंद व्यक्त केला आहे. तसंत आदित्य धरचेही तिने आभार मानले आहेत. पोस्टमध्ये तिने इतरही काही बीटीएस फोटो शेअर करत सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.