'या' बॉलिवूड अभिनेत्रीने चक्क दाढी मिशीत पोस्ट केला फोटो, चाहत्यांना हसू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 14:00 IST2023-03-01T13:59:58+5:302023-03-01T14:00:44+5:30

अभिनेत्रींचे सुंदर, बोल्ड फोटोज तर नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण कधी कोणत्या अभिनेत्रीचा दाढी मिशी लावलेला फोटो पाहिलाय का?

actress sara ali khan posts a photo in beard and mustasche went viral | 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने चक्क दाढी मिशीत पोस्ट केला फोटो, चाहत्यांना हसू अनावर

'या' बॉलिवूड अभिनेत्रीने चक्क दाढी मिशीत पोस्ट केला फोटो, चाहत्यांना हसू अनावर

अभिनेत्रींचे सुंदर, बोल्ड फोटोज तर नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण कधी कोणत्या अभिनेत्रीचा दाढी मिशी लावलेला फोटो पाहिलाय का? सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हिने स्वत:च सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. यात तिची चक्क दाढी मिशी दिसत आहे. 

सारा अली खानचा मित्र दिग्दर्शक होमी अदाजानिया (Homi Adajania) याचा आज वाढदिवस आहे. आपल्या खास मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान एका फोटोत ती स्विमींग पूलजवळ बसली आहे. तिला चक्क दाढी मिशी आलेली दिसत आहे. अर्थात हा फोटो तिनेच एडिट केला आहे. कोणालाही हसूच येईल असा हा फोटो आहे. तिने असा विनोदी फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'यात फोटोग्राफरला शोधा... माझ्यातील स्त्री भावनेला सुंदररित्या पडद्यावर आणण्यासाठी धन्यवाद होमी अदाजानिया. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.'

तिचा असा फोटो मित्र होमीनेच काढला आहे. मागील काचेवर त्याचं प्रतिबिंब दिसून येतंय. साराने एक होमी बरोबर व्यायाम करतानाचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. मात्र प्रत्येकाचीच नजर त्या दाढी मिशी वाल्या फोटोकडेच जातीये. तिच्या विनोदी फोटोवर चाहत्यांनाही प्रचंड हसू येतंय.

सारा अली खान लवकरच करण जोहरच्या 'ऐ वतन मेरे वतन' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तिने तरुण स्वातंत्र्यसेनानीची भूमिका साकारली आहे. याशिवाय सारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलसोबत सारा डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 

Web Title: actress sara ali khan posts a photo in beard and mustasche went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.