एका हातात शॅम्पेन अन् त्याचवेळी दुसरीकडे ब्रेस्टमिल्क पंप करताना दिसली अभिनेत्री, नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:58 IST2025-02-18T10:56:06+5:302025-02-18T10:58:04+5:30
या प्रकारामुळे अभिनेत्री चांगलीच ट्रोल होत आहे.

एका हातात शॅम्पेन अन् त्याचवेळी दुसरीकडे ब्रेस्टमिल्क पंप करताना दिसली अभिनेत्री, नेटकरी भडकले
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटेचा (Radhika Apte) बॉलिवूड ते हॉलिवूड असा यशस्वी प्रवास साहिला आहे. राधिका मोजक्या सिनेमांमध्ये दिसते मात्र तिची भूमिका कायमस्वरुपी लक्षात राहते. गेल्या वर्षी राधिका लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर आली आणि सर्वांना सुखद धक्काच बसला. राधिका गरोदर होती आणि तिने बेबी बंप फ्लॉन्ट करत रेड कार्पेटवर हजेरी लावली. तर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राधिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यानंतर नव्यानेच आई झाल्यावर आयुष्य कसं सुरु आहे याविषयी तिने पोस्ट केली आहे. मात्र यावरुन ती ट्रोलही होत आहे.
राधिका आपटेने नुकतीच 'बाफ्टा' पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी तिने अवॉर्ड्सच्या मध्येच ब्रेक घेत वॉशरुममध्ये जाऊन ब्रेस्टमिल्क पंप केले. विशेष म्हणजे तिच्या दुसऱ्या हातात चक्क शॅम्पेन होती. राधिकाने फोटो शेअर करत लिहिले,"बाफ्टामधलं माझं वास्तव. मला नताशाचे आभार मानायचे आहेत. तिच्यामुळे मी अवॉर्ड सोहळ्याला येऊ शकले. माझ्या ब्रेस्टपंपच्या वेळेनुसारच तिने माझं शेड्युल ठरवलं होतं. ती माझ्यासोबत वॉशरुममध्ये तर आलीच पण सोबतच शॅम्पेनही घेऊन आली. नुकतंच आई होणं आणि काम सांभाळणं कठीण आहे. तसंच फिल्म इंडस्ट्रीत अशा प्रकारे काळजी घेतली जात असेल तर हे नक्कीच वाखणण्याजोगं आहे."
राधिकाच्या या फोटोवर अभिनेत्री अमृता सुभाष, कल्की यांनी कमेंट करत प्रोत्साहन दिलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र कमेंट करत काळजी व्यक्त केली आहे.' ब्रेस्टपंप करताना अल्कोहोल घेणं धोकादायक आहे', 'बाळाच्या दुधात अल्कोहोल जाऊ शकतं. हे बाळासाठी अनहेल्दी आहे', 'ब्रेस्टफीडिंग करताना शॅम्पेन कोण पितं?' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं आहे. तर काही जाणकारांनी कमेंट करत हे अगदी नॉर्मल असल्याचं सांगत राधिकाची बाजूही घेतली आहे.
राधिकाने २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. बेनेडिक्ट हा ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. लग्नानंतर १२ वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत.