"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:40 IST2026-03-12T13:38:21+5:302026-03-12T13:40:29+5:30
एकाच पठडीतल्या भूमिकांना कंटाळली अन् हॉलिवूडमध्ये बस्तान मांडलं, बॉलिवू़ड सोडण्याबद्दल म्हणाली...

"मला घाणीमध्ये राहणं…", बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या अभिनेत्रीचं मोठं विधान, चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Bollywood Actress: २००० साली मिस वर्ल्ड झाल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवून लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा.२००३ मध्ये आलेल्या 'द हीरो- लव स्टोरी ऑफ स्पाय' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यात प्रियंका सेकंड लीड भूमिकेत होती. 'एतराज', 'सलाम ए इश्क', 'फॅशन' तसेच अलिकडेच आलेले 'बर्फी', मेरी कॉम',' बाजीराव मस्तानी' या चित्रपटांमुळे तिच्या करिअरचा आलेख उंचावला. हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर हॉलिवूडमध्येही तिने आपलं बस्तान बसवलं आहे. परंतु, यशाच्या शिखरावर असताना तिने बॉलिवूडकडे पाठ फिरवली आणि हॉलिवूडच्या दिशेने वाटचाल सुरु केली.
अलिकडेच प्रियंका चोप्राने'नॉट स्किनी बट फॅट' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यादरम्यान, देसी गर्लने तिच्या हॉलिवूडमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितल. यावेळी प्रियंकाने तिच्या पहिला तमिळ चित्रपट थमिझन बद्दल उल्लेख करत सहकलाकार विजयचं कौतुकही केलं. त्यावेळी प्रियांका म्हणाली की,"विजयला पाहण्यासाठी सेटवर मोठी गर्दी जमली तेव्हा तिला पहिल्यांदाच स्टारडमची खरी ताकद पाहायला मिळाली."दरम्यान, प्रियंकाने असंही सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीला,तिला वाटायचं अभिनय क्षेत्र म्हणजे
प्रसिद्धी आणि लोकप्रियता. पण, हे काम खूप वेगळं असतं.
कालांतराने तिचा याबद्दलचा दृष्टिकोन बदलला.
पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीला तिने बॉलिवूड कारकिर्दीत आलेल्या आव्हानांमुळे तिने भारताबाहेर संधी शोधण्याचा निर्णय घेतला का? याबद्दल प्रश्न विचारला गेला. त्यावर प्रियंकाने अगदी स्पष्टपणे उत्तर दिलं. ती म्हणाली,"कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही. आपल्या सर्वांनाच संघर्षांचा सामना करावा लागतो. मी त्या लोकांपैकी ज्यांना घाणीत राहायला आवडत नाही. आपण जर त्याची ठिकाणी अडकून राहिलो तर त्याची आपल्याला सवय होते." शिवाय एकाच पठडीतील भूमिका साकारल्याने वेगळं काहीतरी करण्याची तिला इच्छा होती. या विचाराने तिला हॉलिवूडमध्ये काम करण्यास प्रवृत्त केलं असं अभिनेत्रीने सांगितलं.