बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा एका आयटम नंबरवर ठुमके लगावणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 10:37 IST2025-08-04T10:35:06+5:302025-08-04T10:37:46+5:30

६ वर्षानंतर बॉलिवूडच्या 'देसी गर्ल'चं इंडस्ट्रीत दमदार कमबॅक; सोबतीला आहेत 'हे' कलाकार

actress priyanka chopra comback in bollywood after 6 years says report know about all information | बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा एका आयटम नंबरवर ठुमके लगावणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

बॉलिवूडची 'देसी गर्ल' पुन्हा एका आयटम नंबरवर ठुमके लगावणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

Priyanka Chopra:बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra). क्वांटिको या सीरिजच्या माध्यमातून प्रियंका परदेशी प्रेक्षकांच्याही मनावर राज्य करु लागली आहे. पण, ती  बॉलिवूडमध्ये फारशी सक्रिय असल्याची दिसली नाही. द स्काई इज पिंक चित्रपटानंतर अभिनेत्रीने हॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. त्यात आता या अभिनेत्री संदर्भात महत्वाची अपडेट समोर येते. प्रियंका लवकरच एका बॉलिवूड चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तिचे चाहते देखील प्रचंड खुश आहेत.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, बॉलिवूडची देसी गर्ल संजय लीली भन्साळी यांच्या लव्ह अॅंड वॉर चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अभिनेत्रीचा एक डान्स नंबर असणार आहे, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, याबाबत प्रियंका चोप्रा किंवा निर्मात्यांकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु प्रियांकाच्या कमबॅकबद्दस कळताच तिचे चाहते खूप आनंदी आणि उत्साहित आहेत.प्रियंका याआधी राम लीला चित्रपटातील राम चाहे लीला हे गाणं सुपरहिट ठरलं होतं. आता ती पुन्हा एकदा डान्स नंबरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं सांगण्यात येत आहे.

'लव्ह अँड वॉर' मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याचे आधीच समोर आले आहे.चित्रपटाचे शूटिंग सुरू झालं आहे. हा बहुचर्चित चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: actress priyanka chopra comback in bollywood after 6 years says report know about all information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.