विमानात जेवल्यानंतर बेशुद्ध झाली, मदतीला कोणीच आलं नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:16 IST2025-12-10T12:15:01+5:302025-12-10T12:16:29+5:30
ट्वीट शेअर करत तिने एअरलाईन्सविरोधात तक्रार केली आहे.

विमानात जेवल्यानंतर बेशुद्ध झाली, मदतीला कोणीच आलं नाही; प्रसिद्ध अभिनेत्रीची तक्रार
बॉलिवूड अभिनेत्री नीलम कोठारीला नुकतंच विमान प्रवासात धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. टोरंटोवरुन मुंबईला येणाऱ्या एतिहाद एअरलाईन्समध्ये ती चक्क बेशुद्धच झाली. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नक्की काय घडलं ते सांगितलं. तसंच पोस्टमधून तिने एअरलाईन्सची पोलखोल केली. एकीकडे इंडिगोचा गोंधळ सुरु असताना आता एतिहाद एअरवेजमध्ये नीलमची पोस्ट काय वाचा
अभिनेत्री नीलम कोठारीने लिहिले, "डिअर एतिहाद, टोरंटो ते मुंबई विमान प्रवासात मला निराशाजनक अनुभव आला. एक तर फ्लाईट ९ तास उशिरा होती आणि दुसरं म्हणजे मी विमानातील जेवण केल्यानंतर भयंकर आजारी पडले आणि बेशुद्धल झाले. काही प्रवाश्यांनी मला सीटवर बसवलं. पण माझ्यावर उपचार करण्यास कोणीही आलं नाही. क्रू मधला एकही सदस्य मदतीला आला नाही. मी तुमच्या ग्राहक सेवेला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण मला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. अशा प्रकारचा बेजबाबदारपणा अस्वीकार्ह आहे. कृपया लवकरात लवकर या प्रकरणाकडे लक्ष द्या."

नीलमने हे ट्वीट केलं असून एतिहादने तिच्या ट्वीटला प्रतिसाद दिला आहे. तुमचं तक्रार सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलं असून तिला वैयक्तिक मेसेज करायला सांगितला आहे. तर दुसरीकडे काही नेटकऱ्यांनी कमेंट करत नीलमशी सहमती दर्शवली आहे.
नीलम कोठारी 'फॅब्युलस लाईव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाईव्ह्ज'मध्ये दिसली होती. तसंच ती टेलिव्हिजनवरील रिएलिटी शोमध्ये दिसते. नीलम एकेकाळी हिंदी सिनेसृष्टीत आघाडीवर होती. गोविंदा, मिथून, सनी देओल यांच्यासोबत काम केलं आहे. सध्या नीलम स्वत:चा ज्वेलरी बिझनेस सांभाळते.