'या' 22 वर्षीय अभिनेत्रीचे किंग खानपेक्षाही जास्त फॉलोअर्स; महिन्याला कमावते इतके लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 15:46 IST2024-03-13T15:45:44+5:302024-03-13T15:46:40+5:30

वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

actress Jannat Zubair has more followers than shahrukh khan has networth in millions | 'या' 22 वर्षीय अभिनेत्रीचे किंग खानपेक्षाही जास्त फॉलोअर्स; महिन्याला कमावते इतके लाख

'या' 22 वर्षीय अभिनेत्रीचे किंग खानपेक्षाही जास्त फॉलोअर्स; महिन्याला कमावते इतके लाख

फिल्म इंडस्ट्रीत असे अनेक तारे आहेत ज्यांना खूप कमी वयात यश मिळवलं आहे. कोणी टॅलेंटच्या जोरावर प्रसिद्धीझोतात येतं तर कोणी स्टारकिड्स म्हणूनही लाईमलाईटमध्ये असतात. सध्या एका अभिनेत्रीची सोशल मीडियावर खूपच हवा आहे. फॉलोअर्सच्या बाबतीत या टीव्ही अभिनेत्रीने थेट किंग खानलाही मागे टाकलं आहे. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात करणारी ही अभिनेत्री आहे तरी कोण?

'फुलवा' आणि 'काशी अब ना रहे तेरा कागज कोरा' मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली ही अभिनेत्री आहे जन्नत जुबैर (Jannat Zubair) . सध्या ती केवळ २२ वर्षांची असून वयाच्या ७ व्या वर्षापासूनच मालिकांमध्ये काम करत आहे. जन्नतने सिनेमा, रिएलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. तिचा छोटा भाऊ देखील अभिनेता आहे. दोघांचं युट्यूब चॅनल आहे. जन्नतचे सोशल मीडियावर करोडो फॉलोअर्स आहेत. खूप कमी वयात तिला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 49.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. जे शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त आहेत. 

जन्नत जुबैरची संपत्ती तब्बल 25 कोटी इतकी आहे. ती दर महिन्याला 25 लाख रुपये कमावते. 'खतरो के खिलाडी' मध्ये ती सर्वात जास्त फीस घेणारी स्पर्धक होती. तिने एका एपिसोडसाठी 18 लाख रुपये चार्ज केले होते. याशिवाय जन्नत इन्स्टाग्रावरील एका पोस्टसाठी 1.5-2 कोटी रुपये घेते. जन्नतने हिंदी, पंजाबी म्युझिक अल्बम्सही केले आहेत. 

Web Title: actress Jannat Zubair has more followers than shahrukh khan has networth in millions