आवडता ‘आयपीएल’ संघ कोणता MI की CSK? अभिनेत्री जान्हवी कपूरने उत्तर देत केला आवडत्या खेळाडूबद्दलही खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:28 IST2024-05-29T16:24:47+5:302024-05-29T16:28:44+5:30
अलिकडेच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण, याचा खुलासा केला आहे.

आवडता ‘आयपीएल’ संघ कोणता MI की CSK? अभिनेत्री जान्हवी कपूरने उत्तर देत केला आवडत्या खेळाडूबद्दलही खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao) यांचा आगामी चित्रपट 'मिस्टर अॅण्ड मिसेस माही'(Mr and Mrs Mahi Movie) रिलीजसाठी सज्ज आहे. एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट या सिनेमातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. सध्या जान्हवी सिनेमच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये जान्हवीनं तिचा आवडता क्रिकेटपटू कोण, याचा खुलासा केला आहे.
जान्हवीने नुकतेच 'द लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. यावेळी तिनं क्रिकेवर भाष्य केलं. याच मुलाखतीत जान्हवीला तिचा आवडता आयपीएल संघ कोणता? हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी जान्हवीनं ती मुंबई इंडियन्सची फॅन असल्याचं सांगितलं. यासोबतच टीमधील सर्वात जास्त आवडता खेळाडू कोणता या प्रश्नावर जान्हवीनं क्रिकेटपटू रोहित शर्मा हे नावं घेतलं. रोहित शर्माची डाय हार्ड फॅन असल्याचं जान्हवी म्हणाली. शिवाय, अद्याप रोहितला भेटली नसून त्याच्या पत्नीला मात्र भेटल्याचं जान्हवीनं सांगितलं.
जान्हवीचं हे उत्तर ऐकून मुंबई इंडियन्स आणिर रोहितचे चाहते आनंदी झाले. दरम्यान, जान्हवीचा 'मिस्टर अँड मिसेस माही' येत्या ३१ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनची आहे. तर शरण शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाशिवाय, जान्हवी ही ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तिनं राम चरणसोबत एक चित्रपटही साइन केलाय.