Money Laundering Case अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजुर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:46 IST2022-11-15T16:30:02+5:302022-11-15T16:46:50+5:30
२०० कोटी रुपयांच्या हेरगिरीप्रकरणी जॅकलीन अनेक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात होती. याप्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे.

Money Laundering Case अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला दिलासा, कोर्टाकडून जामीन मंजुर
बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ला दिलासा मिळाला आहे. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाकडून जॅकलीनला जामीन मंजूर करण्यात आला आहे. २०० कोटी रुपयांच्या हेरगिरीप्रकरणी जॅकलीन अनेक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात होती. याप्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर तुरुंगात आहे. सुकेश कडून महागड्या वस्तू घेतल्याप्रकरणी तिची सुद्धा चौकशी दिल्ली ईडी ची टीम करत होती. अखेर पटियाला हाऊस कोर्टाने आज जॅकलीनला जामीन मंजुर केला आहे. २ लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तिला जामीन मंजुर झाला आहे.
#UPDATE | Bail granted to Actor Jacqueline Fernandez in Rs 200 crores money laundering case on furnishing of a personal bond of Rs. 2 lakh and one surety in the like amount.
— ANI (@ANI) November 15, 2022
जॅकलीन कित्येक महिन्यांपासून ईडी चौकशीच्या फेऱ्यात होती. तिचे आणि सुकेशचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या वकिलांनी सांगितले होते की ते शेवटपर्यंत लढणार. आरोपी सुकेशने जेलमधून लिहिलेल्या पत्रात हे नमुद केले की त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. म्हणून त्याने महागडे गिफ्ट्स दिले होते. यामध्ये जॅकलिन चा किंवा तिच्या कुटुंबाचा दोष नाही. अखेर जॅकलिनला आज जामीन मंजुर झाला आहे.