दोन बायका फजिती ऐका! दोन लग्न करुनही धर्मेंद्र राहतात एकटे; हेमामालिनीने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:45 IST2023-07-12T10:45:13+5:302023-07-12T10:45:41+5:30

Dharmendra: दोन लग्न करुनही धर्मेंद्र आज एकटेच राहत आहेत. एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत न राहण्यामागचं कारण सांगितलं.

actress hema malini reveals why she does not live with dharmendra | दोन बायका फजिती ऐका! दोन लग्न करुनही धर्मेंद्र राहतात एकटे; हेमामालिनीने सांगितलं कारण

दोन बायका फजिती ऐका! दोन लग्न करुनही धर्मेंद्र राहतात एकटे; हेमामालिनीने सांगितलं कारण

बॉलिवूडचा ही-मॅन अर्थात धर्मेंद्र (dharmendra)  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत येत आहेत. अलिकडेच त्यांच्या नातवाचं करणचं लग्न झालं. हे लग्न विविध कारणांसाठी चर्चेत आलं. मात्र, खासकरुन हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाशकौर यांची चर्चा रंगली. करणच्या लग्नाला हेमा मालिनी या आल्या नाहीत. त्यामुळे धर्मेंद्र यांच वैवाहिक आयुष्य पुन्हा चर्चेत आलं. विशेष म्हणजे दोन लग्न करुनही धर्मेंद्र आज एकटेच राहत आहेत. याविषयी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये हेमा मालिनी (hema malini) यांनी धर्मेंद्रसोबत न राहण्यामागचं कारण सांगितलं.

हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लग्नाला ४३ वर्ष झाली. मात्र, उतरत्या वयात ही जोडी एकमेकांपासून दूर राहत आहे. विशेष म्हणजे धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही हेमा मालिनी यांनी त्यांच्यासोबत दुसरा संसार थाटला. परंतु, लव्ह मॅरेज करुनही ही जोडी एकमेकांपासून दूर राहतात. इतकंच कशाला धर्मेंद्र त्यांच्या पहिल्या पत्नीसोबतही राहत नाहीत. त्यामुळे दोन लग्न करुनही धर्मेंद्र आज एकटीच असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी हेमा मालिनी यांनी अलिकडेच एका मुलाखतीत भाष्य केलं.

"तिने जे केलं ते मी केलं नसतं"; धर्मेंद्र-हेमाच्या लग्नावर प्रकाश कौर यांची प्रतिक्रिया

"अशाप्रकारे जगायला कोणालाच आवडत नाही. पण,आपल्या आयुष्यात काही वेळा अनपेक्षिक वळणं येतात आणि आपल्याला त्याचा स्वीकार करावा लागतो. मात्र, आपल्याला त्याच्याशी जुळवून घेता आलं पाहिजे. धर्मेंद्र कायम माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी भक्कमपणे उभे राहिले. आपल्या नवऱ्यासोबत आपलं एक सर्वसामान्य कुटुंब असावं असं प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण, काही वेळा परिस्थिती आपल्याला वेगळ्या वळणावर नेऊन ठेवते", असं हेमा मालिनी म्हणाल्या.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्यापासून दूर रहावं लागत असल्यामुळे खेद किंवा नाराजी अजिबात नाही. आमच्या आयुष्यात जे काही सुरु आहे त्याचं मला वाईट वाटत नाही. आम्ही आनंदात आहोत असंही त्या म्हणाल्या. हेमा मालिनी यांच्यासाठी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी धर्मेंद्र ४ मुलांचे वडील होते. परंतु, उतार वयात ते दोन्ही पत्नींसोबत राहत नाहीत.
 

Web Title: actress hema malini reveals why she does not live with dharmendra