"आपण पूर्णपणे बिघडलोय, कारण...", ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या- "तेव्हा आम्ही अनेक तास..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:29 IST2026-01-18T13:18:08+5:302026-01-18T13:29:29+5:30

"आम्ही कुठल्याही परिस्थितीत काम केलं, पण...", ८ तास कामाच्या मागणीवर फरीदा जलाल यांचं स्पष्ट मत, म्हणाल्या-"या क्षेत्रात येण्यापूर्वी..."

actress farida jalal reaction on 8 hour shift debate in film industry says | "आपण पूर्णपणे बिघडलोय, कारण...", ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या- "तेव्हा आम्ही अनेक तास..."

"आपण पूर्णपणे बिघडलोय, कारण...", ८ तास काम करण्याच्या मागणीबद्दल फरीदा जलाल यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या- "तेव्हा आम्ही अनेक तास..."

Farida Jalal: पडद्यावर कधी आई तर कधी सासू साकारुन लाखो सिनेरसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे फरीदा जलाल. जवळपास ६ दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. फरीदा यांनी त्यांच्या आजवरच्या अभिनय कारकि‍र्दीत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. लवकरच फरीदा जलाल ओ रोमियो... या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. दरम्यान, या चित्रपटापेक्षा फरीदा यांच्या डायलॉगजची देखील तितिकीच चर्चा होताना दिसतेय.  ५० वर्षांत फरिदा जलाल यांनी इंडस्ट्रीमध्ये अनेक बदल पाहिले आहेत. 

अलिकडेच फरीदा यांच्या आगामी ओ रोमियो चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. याच निमित्ताने त्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहेत. अशातच अलिकडेच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या चर्चेत असलेल्या एका विषयाबद्दल फरिदा जलाल यांना प्रश्न विचारण्यात आला. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीची इंडस्ट्रीत बरीच चर्चा झाली. यामुळे या अभिनेत्रीला संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट' या चित्रपटातूनही बाहेर पडावं लागलं. अनेक लोकांनी दीपिकाला पाठिंबा दिला, तर काहींनी या मागणीवर टीकाही केली. आता फरिदा जलाल यांनी या मुद्द्यावर आपले मत मांडले आहे.झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या,"तेव्हा आम्ही अनेक तास आणि कुठल्याही परिस्थितीत काम करायचो.त्यावेळी ही काही मोठी गोष्ट वाटत नव्हती.शिवाय  आम्ही तर व्हॅनिटी व्हॅनशिवाय ते आउटडोअर शूट! कल्पना करा... आणि तेही एका मुलीसाठी.माझ्यासारख्या मुलीसाठी जी नेहमी आपल्या आईलाच चिकटून असायची. "

त्यानंतर पुढे फरीदा जलाल म्हणाल्या,"आता आपण पूर्णपणे बिघडलो आहोत; सगळं काही खूप सोपं झालं आहे. पूर्वी अभिनय करणं खूप कठीण असायचं. कारण,तेव्हा इतक्या सोयी-सुविधा नव्हत्या.या क्षेत्रात येण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागायचा. मात्र, मला हे काम आवडायचं आणि मला हेच करायचे होतं. म्हणूनच मी आज इथे आहे."असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, ओ रोमियो हा चित्रपट येत्या १३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि फरीदा जलाल यांच्या व्यतिरिक्त, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, अविनाश तिवारी, विक्रांत मेस्सी आणि तमन्ना भाटिया यांसारख्या कलाकारांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title : फरीदा जलाल का 8 घंटे की शिफ्ट पर बयान: 'हमने तब लंबे समय तक काम किया'

Web Summary : फरीदा जलाल ने वैनिटी वैन के बिना लंबे समय तक काम करने को याद किया, और अब छोटी शिफ्ट की मांगों के साथ इसकी तुलना की। उनका मानना है कि अब चीजें आसान हो गई हैं, लेकिन उनके जुनून ने उन्हें तब आगे बढ़ाया।

Web Title : Farida Jalal on 8-hour shifts: 'We worked long hours then'

Web Summary : Farida Jalal recalls working long hours without vanity vans, contrasting it with current demands for shorter shifts. She believes things have become easier now, but her passion kept her going then.