अखेर २० दिवसांनी दीपिका पादुकोणने रणवीरच्या 'धुरंधर २' बद्दल सोडलं मौन, तीन वाक्यात स्पष्टच म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:03 IST2026-04-08T10:00:35+5:302026-04-08T10:03:13+5:30
संपूर्ण देशात रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण मात्र काहीच बोलली नाही. आता इतक्या दिवसांनी दीपिकाने तीन ओळीत उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केलीये.

अखेर २० दिवसांनी दीपिका पादुकोणने रणवीरच्या 'धुरंधर २' बद्दल सोडलं मौन, तीन वाक्यात स्पष्टच म्हणाली...
एकीकडे रणवीर सिंगचा 'धुरंधर २' यशाची शिखरं गाठत आहे. या सिनेमाने आतापर्यंत १००० कोटींची कमाई केलीये. जगभरात 'धुरंधर २'चा डंका वाजत आहे. संपूर्ण देशात रणवीर सिंगच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण रणवीरची पत्नी दीपिका पादुकोण मात्र काहीच बोलली नाही. 'धुरंधर २' रिलीज होऊन जवळपास १५ दिवस झाले तरीही दीपिकाने मौन बाळगलं होतं. त्यामुळे लोक दीपिकाला ट्रोल करत होते. आता इतक्या दिवसांनी दीपिकाने तीन ओळीत उत्तर देऊन ट्रोलर्सची बोलती बंद केलीये.
दीपिका 'धुरंधर २' बद्दल काय म्हणाली?
झालं असं की, सोशल मीडियावर एक रिल व्हायरल झाली. या रिलच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलं की, ''दीपिका पादुकोणने हल्लीच ५०० कोटींचं बजेट असलेल्या धुरंधर २ साठी सायलेंट ट्रीटमेंट केली आहे. धुरंधर २ ने जागतिक बॉक्स ऑफिसवरही रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. त्यावेळी दीपिकाने आपल्या सासरच्या मंडळींसोबत एका सितार कॉन्सर्टमध्ये सहभाग घेतला. कोणतीही पोस्ट नाही, काही कौतुक नाही, फक्त मौन. दीपिकाला दिग्दर्शकाविरोधात काही बोलायचं आहे का? इंटरनेटवरील गोष्टींपासून ती स्वतःचा बचाव करतेय का?''

या रिलखाली दीपिका पादुकोणने तीन ओळीत पोस्ट लिहून सगळ्यांची बोलती बंद केली. दीपिका म्हणाली, ''माझ्या प्रिय मित्रा, मी तुम्हा सर्वांच्या खूप आधी हा सिनेमा पाहिलाय, याची नोंद घ्यावी. आता सांग, कोणाची मस्करी होतेय?'' दीपिकाने दिलेलं उत्तर इतकं व्हायरल झालंय की, अनेकांनी तिच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलंय. एकूणच पती रणवीर सिंगचा 'धुरंधर २' दीपिकाने आधीच बघितला आहे. ती सोशल मीडियावर याविषयी बोलत नाही हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे, असं म्हणत चाहत्यांनी अभिनेत्रीचं समर्थन केलंय.