आता कशी आहे सलीम खान यांची तब्येत? 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणाऱ्या चित्रांगदाने दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:36 IST2026-02-19T16:35:24+5:302026-02-19T16:36:33+5:30
कशी आहे सलीम खान यांची प्रकृती?

आता कशी आहे सलीम खान यांची तब्येत? 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये दिसणाऱ्या चित्रांगदाने दिली अपडेट
सलमान खानचे वडील ज्येष्ठ लेखक सलीम खान अत्यवस्थ आहेत. ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाहत्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल काळजी वाटत आहे. सलमान खानसोबत 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये भूमिका साकारणारी अभिनेत्री चित्रांगदा सिंहने सलीम खान यांच्या तब्येतीबद्दल अपडेट दिलं आहे. का म्हणाली चित्रांगदा?
आएएनएनसशी बोलताना चित्रांगदा सिंह म्हणाली, "त्यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करते." सलीम खान गेल्या दोन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. आज डॉक्टर त्यांचं व्हेंटिलेटर काढणार होते. तसंच त्यांच्यावर एक सर्जरीही झाली. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं अपडेट समोर आलं आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
बुधवारी लीलावती हॉस्पिटलकडून माहिती आलेली की सलीम खान यांना मायनर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांची तब्येत खराब झाली. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सलीम-जावेद ही लेखक जोडी इंडस्ट्रीत प्रसिद्ध आहे. आपल्या मित्राच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी जावेद अख्तर रुग्णालयात आले होते. सलमान खान दिवस रात्र रुग्णालयाच्या अनेक चकरा मारत आहे. संजय दत्तलाही काल रुग्णालयात आलेलं पाहिलं गेलं. तसंच खान कुटुंबातील इतर सदस्य अरबाज खान, शूरा खान, सलमा खान सगळेच रुग्णालयात आलेले दिसले.