छत्रपती संभाजीनगरची लेक! गाजवतेय दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री, आता थेट रणवीर सिंहसोबत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:57 IST2026-02-25T13:52:12+5:302026-02-25T13:57:03+5:30
विजय देवरकोंडासोबत जमलेली जोडी! साऊथ इंडस्ट्री गाजवतेय छ.संभाजीनगरची लेक,आता धुरंधर अभिनेत्यासोबत झळकणार

छत्रपती संभाजीनगरची लेक! गाजवतेय दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्री, आता थेट रणवीर सिंहसोबत झळकणार
Ranveer Singh Upcoming Movie: 'धुरंधर'च्या यशानंतर अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. एकीकडे, त्याचा 'धुरंधर: द रिव्हेंज' हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे, तर दुसरीकडे, त्याच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल इंडस्ट्रीत जोरदार चर्चा सुरु आहे. धुरंधरनंतर अभिनेत्याकडे सिनेमाची रांग लागली आहे. रणवीर सध्या बिग बजेट प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. त्यापैकीच एक बहुचर्चित आमि बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे 'प्रलय'. दरम्यान, नुकतीच 'प्रलय' या त्याच्या चित्रपटाबद्दल एक अपडेट समोर आली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'प्रलय' हा एक बिग बजेट चित्रपट आहे ज्याच्या दिग्दर्शनाची धुरा जय मेहता यांच्या खांद्यावर आहे. जय मेहता हे 'स्कॅम १९९२: द हर्षद मेहता' या चित्रपटासाठी ओळखले जातात. तसेच, रणवीर सिंग पहिल्यांदाच निर्माता म्हणून या चित्रपटाशी जोडला गेला आहे. मागील काही दिवसांपासून 'प्रलय' मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून कल्याणी प्रियदर्शन झळकणार असल्याची चर्चा होती. मात्र,आता याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, निर्माते चित्रपटात मोठ्या नावांऐवजी नवीन कलाकारांना घेण्याचा विचार करत आहेत. 'प्रलय' चित्रपटात आता अभिनेत्री भाग्यश्री बोरसेची वर्णी लागली आहे. रणवीरसोबत चित्रपटामध्ये कल्याणी प्रियदर्शनसह भाग्यश्री बोरसलेही स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, याबाबत निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोण आहे भाग्यश्री बोरसे?
भाग्यश्रीचा जन्म १९९९ साली छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला.शिक्षण घेतानाच ती मॉडेलिंगही करत होती. तिचा कॅमेरा प्रेझेन्स चांगला असल्याने अनेकांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. भाग्यश्री बोरसे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. भाग्यश्रीने काही जाहिरातींमध्ये काम केलं. नंतर ती बॉलिवूडमध्ये आली. भाग्यश्रीने 'यारियां' आणि 'चंदू चॅम्पियन' मध्ये काम केलं आहे.