बाबो! बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवालने -8 डिग्रीमध्ये शूट केला व्हिडीओ, नेटकरी करतायेत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 15:58 IST2022-02-26T15:51:28+5:302022-02-26T15:58:28+5:30
बॉलिवूडमध्ये एक्शन हिरोपैकी एक विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो.

बाबो! बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवालने -8 डिग्रीमध्ये शूट केला व्हिडीओ, नेटकरी करतायेत कौतुक
बॉलिवूडमध्ये एक्शन हिरोपैकी एक विद्युत जामवाल त्याच्या स्टंटसाठी ओळखला जातो. आपल्या सिनेमासाठी स्वतः स्टंट करण्यावर विद्युत जामवालचा भर असतो. विद्युतच्या जवळपास सर्वच सिनेमात बाकी काही असो वा नसो पण धमाकेदार अॅक्शन असतातच. विद्युत सध्या त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात तो एका बर्फाच्या तलावात डुबकी मारताना दिसत आहे.
सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे जगभरात चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते त्याला फॉलो करतात. विद्युतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. विद्युत जामवालने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो बर्फाच्छादित मैदानात दिसतोय. यानंतर तो बर्फाळ तलाव उतरतो. विद्युत व्हिडीओमध्ये सांगतो की, यावेळी त्या ठिकाणचे तापमान -8 अंश आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचे कौतुक करतायेत.
व्हिडीओ शेअर करत विद्युतने लिहिले - 'जर तुम्हाला कोणी सांगितले की हे अवघड आहे तर ते करणे सोपे आहे.' विद्युतचा हा व्हिडिओ आणि त्याची स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे आणि ते यावर भरभरून प्रतिक्रियाही देत आहेत.