'ही काही शुटिंगची तारीख नाही..'; आदितीसोबत लग्न करण्याविषयी सिद्धार्थचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 12:25 IST2024-04-07T12:01:55+5:302024-04-07T12:25:14+5:30

Siddharth: सिद्धार्थने गुपचूप पद्धतीने आदितीसोबत साखरपुडा करण्याविषयीदेखील भाष्य केलं आहे.

actor-siddharth-talked-about-the-wedding-date-with-aditi-rao-hydari | 'ही काही शुटिंगची तारीख नाही..'; आदितीसोबत लग्न करण्याविषयी सिद्धार्थचं मोठं वक्तव्य

'ही काही शुटिंगची तारीख नाही..'; आदितीसोबत लग्न करण्याविषयी सिद्धार्थचं मोठं वक्तव्य

सध्या सोशल मीडियावर दाक्षिणात्य सुपरस्टार सिद्धार्थ (siddharth) आणि आदिती राव हैदरी (aditi rao hydari) यांची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या जोडीने तेलंगानामध्ये साखरपुडा केला. विशेष म्हणजे या जोडीने सोशल मीडियावर एक सेल्फी पोस्ट करत त्यांच्या एंगेजमेंटची माहिती चाहत्यांना दिली. या फोटोनंतर आता या जोडीच्या लग्नाचीही चर्चा नेटकऱ्यांमध्ये होतीये. ही जोडी लवकरच लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या सगळ्या चर्चांवर आता सिद्धार्थने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने आदितीसोबत कधी लग्न करणार याविषयी माहिती दिली आहे.

२७  मार्च रोजी सिद्धार्थ आणि आदितीने साखरपुडा केला. तेव्हापासून या जोडीची सातत्याने नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. यात अलिकडेच सिद्धार्थने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात उपस्थितांनी त्याला आदितीसोबतच्या लग्नाचा प्लॅन विचारला. यावेळी त्याने साखपुडा झाला पण लग्नाची तारीख मात्र घाईघाईत काढणार नसल्याचं त्याने म्हटलं. सोबतच त्या मागचं कारणही त्याने सांगितलं.

"मला अनेकांनी विचारलं की गुपचूपपणे कोणालाही न सांगता साखरपुडा का केला? पण,कुटुंबाच्या उपस्थितीत खासगी पद्धतीने करणं आणि लपूनछपून करणं यात एक मोठा फरक आहे. ज्या लोकांना आम्ही आमंत्रित केलं नाही त्यांना असं वाटतंय की गुपचूप पद्धतीने आम्ही केलं. पण, जे लोक उपस्थित होतं त्यांना माहितीये की ही एक प्रायव्हेट सेरेमनी होती. ज्यात फक्त फॅमिली आणि इतर काही कुटुंबीय सहभागी होते", असं सिद्धार्थ म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "आदितीने मला कधी होकार दिला हा प्रश्नचं मुळात चुकीचा आहे. कारण, त्याचा फायनल रिझल्ट आज तुमच्या समोर आहे. ती मला हो म्हणले की नाही याची मला खूप काळजी वाटत होती. पण, सुदैवाने ती हो म्हणाली. लग्न म्हणजे कोणत्या शुटिंगची तारखी नाही की ठरलं आणि फायनल केलं. ही आयुष्यभर लक्षात राहणारी तारीख आहे. त्यामुळे एकदा का तिने यावर निर्णय घेतला की लग्न योग्य वेळी होईल."

दरम्यान, सिद्धार्थ लवकरच 'इंडियन 2' मध्ये झळकणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत कमल हासन, काजल अग्रवाल आणि रकुल प्रीत सिंह ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत.

Web Title: actor-siddharth-talked-about-the-wedding-date-with-aditi-rao-hydari